'हर घर तिरंगा अभियान' साठी विक्रीस ठेवलेल्या तिरंगा ची किंमत एकसारखी असावी यासाठी दिले तहसीलदार यांना निवेदन... बारामती:- दि.५/८/२०२२रोजी बारामती येथील मा. तहसिलदार ,तहसिलदार कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती, यांना श्री. संतोष पोपट जाधव (पत्रकार),व श्री. प्रविण शिवाजी वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते,लेखी निवेदन दिले की,'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावायची आहे, परंतु त्या तिरंग्याची किंमत सर्व दुकानांमध्ये एकसारखी
असणेबाबत आदेश होण्यासाठी सूचना कराव्यात संपूर्ण देशात 'हर घर तिरंगा' अभियान
राबविण्यात येणार आहे ही बाब अभिमानास्पद व देशाची मान उंचविणारी आहे व त्यास उत्फुर्त प्रतिसाद मिळणार असून यासाठी जे तिरंगा विक्री करणारे नेमले आहेत त्यांना एकच रेट ने एकच किंमतीमध्ये तिरंगा झेंडा ठेवावा त्याची किंमत
योग्य व सगळीकडे एकसारखी किंमत असावी जेणेकरून तिरंग्याच्या नावाखाली जनतेची
लुट होवू नये यासाठी आपण बारामती तालुका व बारामती शहर याठिकाणी नेमलेल्या विक्रेत्यास आदेश करावा अश्या विनंतीचे पत्र देण्यात आले तर माहितीसाठी मा. मुख्याधिकारी.. बारामती नगर परिषद,मा. मुख्याधिकारी.. माळेगांव नगरपंचायत, माळेगांव बु।।यांना हे निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment