पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार ईडीच्या रडारवर?,चौकशीचे आदेश..!
मुंबई :-बारामतीचे व कर्जत चे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या अडचणी
वाढण्याची शक्यता आहे. रोहित पवार हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून वारंवार राज्य सरकार, भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. ते सध्या राज्यातील घडामोडींवर रोखठोक वक्तव्य करताना पहायला मिळत आहे. याच दरम्यान रोहित पवार यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे आदेश ईडीने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा. लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन 2006 ते 2012 पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेंद्र पवार हे देखील या कंपनीत सन 2006 ते 2009 या कालावधीत संचालक होते. तसेच, या कंपनीशी येस बँक – डिएचएफएल घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान व सारंग वाधवान यांचा देखील अत्यंत जवळून संबंध असल्याचे समजते. परंतु वाधवान बंधूंचे नाव दोन्ही बँक घोटाळा प्रकरणात आल्यानंतर रोहित पवार यांनी संचालक पदाचा राजानामा दिल्याचे समजते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला मिळाली असून या तक्रारीवरुन ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.ग्रीन एकर्स प्रा. लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते.या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आली, तसेच देशात आली.याची चौकशी व्हावी अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या तक्रारीवरुन प्राथमिक तपास सुरु झाला आहे.कंपनीने कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत.
No comments:
Post a Comment