शरदनगर गणेशोत्सव मध्ये 105 बॉटल रक्त संकलित...
बारामती, प्रतिनिधी :- बारामती मधील शरदनगर गणेश तरुण मंडळ व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने शरदनगर गणेश मंदिर तांदुळवाडी, बारामती येथे काल दिनांक 04-09-2022 रोजी गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शरदनगर गणेश तरुण मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या शिबिरात 105 लोकांनी आपले
सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
गेल्या वर्षी देखील रक्तदानाचा हा उपक्रम राबविण्यात आला होता. दरवर्षी मंडळा तर्फे गणेशोत्सव मध्ये सामाजिक उपक्रम राबविले जातात.
No comments:
Post a Comment