श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 22, 2022

श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी*

*श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी*

बारामती:-  रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापूजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची चित्ररथाची आकर्षक सजावट करून तसेच वेगवेगळ्या राष्ट्र पुरुषांची वेशभूषा परिधान करून आकर्षक बारामती शहरांमधून लेझीम ढोल ताशा झांज पथक सह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचेही पूजन करून कर्मवीरांच्या रथाची मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी माननीय सदाशिव बापूजी सातव, डॉ.चंद्रशेखर मुरूमकर सर, श्री दिलीप नाना ढवाण पाटील, श्री बी. एन. पवार सर, श्री पी एन. तरंगे सर, श्री पोपट मोरे सर ,श्री सय्यद सर श्री बी.ए. सुतार सर, डॉ. आगवणे सर, डॉ. माळी मॅडम, डॉ. गोसावी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते आणि माझी वसुंधरा, कचरा व्यवस्थापन ,परिसर स्वच्छता याविषयी रांगोळी प्रदर्शन सौ. तृप्ती कांबळे सौ. सुनीता कोकरे  सौ.अलका चौधर, श्रीम. सारिका गवळी श्रीम. प्रीती चव्हाण, सौ प्रियांका कदम यांनी नियोजन केले होते तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागामार्फत आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सौ. तृप्ती विलास कांबळे यांचा सत्कार मा. श्री सदाशिव बापूजी सातव यांच्या हस्ते करण्यात आला.  डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त पत्रकार बंधू श्री. योगेश नालंदे,श्री सुरज देवकाते, श्री.संतोष जाधव ,श्री. राजू कांबळे,श्री. अमोल यादव, श्री. अमित बगाडे  यांचाही सत्कार शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल श्री धो. आ. सातव हायस्कूल, टी. सी. कॉलेज, शाहू हायस्कूल येथील सर्व  विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षकेतर सेवकवृंद या सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री. बी. ए. सुतार सर यांनी केले तर आभार सुजित जाधव सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment