जातीवादी शिवीगाळ व विनयभंग प्रकरणी आरोपींना 2 वर्षाचा कारावास तर चांगल्या वर्तवणुकीसाठी 2 वर्षाच्या हमीवर सुटका..! बारामती:- इंदापूर पो. स्टे. :- गुन्हा रजि. नं. १०२/२०१३ तसेच अनू. जाती गुन्हा भा.द.वि. कलम १४३,१४७,३२४,४५२,३५४,३२३
जमाती प्रति कायदा कलम ३ (१) (१०)११ तसेच नागरी हक्क संरक्षण कायदा ७(१ (ड)प्रमाणे,सचिन चंद्रकांत तनपूरे,अनिल चांगदेव तनपूरे,अजय धुळेश्वर तनपुरे,सुरेश सर्जेराव तनपुरे,आबा उर्फ सतिश दामोदर तनपुरे,माउली उर्फ ज्ञानदेव चांगदेव तनपुरे,संजय मारुती तनपुरे,सचिन पंडीत तनपुरे, सर्जेराव रामचंद्र तनपूरे,लहु धूळेश्वर तनपूरे,अतूल धुळेश्वर तनपूरे,हरी सर्जेराव तनपुरे,दासा उर्फ रोहीदास दामोदर तनपुरे,चिंटया उर्फ सोमनाथ अर्जून चोरमले,सोमनाथ चंद्रकांत तनपुरे,महावीर सदाशिव तनपूरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता,दि.२७/०३/२०१३ रोजी व्याहळी ता. इंदापूर येथे घटना घडली.२७/०३/२०१३ रोजी दुपारी आरोपी सुरेश तनपुरे व लहु तनपुरे व फिर्यादी विकास चितारे यांचे बरोबर मोटारसायकल ला कट मारण्या वरुन
वादा वाद झाली होती.त्यानंतर त्याच दिवशी सायं ६ वा. चे सुमारास सर्व आरोपी मोटार सायकल
वरती फिर्यादी यांचे दारा समोरील अंगणात आले व सर्वांनी मिळून फिर्यादी व त्याचे घरातील लोकांना काठी, गज ई. ने मारहाण केली व महिलांचा विनयभंग करुन जाती वाचक शिवीगाळी केली म्हणून विकास शिवलाल चितारे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणाचा तपास तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नामदेव मिट्टेवाड यांनी तपास केला होता. सदर खटला बारामती जिल्हा व सत्र न्यायालया मध्ये चालला. सदर खटल्या मध्ये विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहीले. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा व सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरुन बारामती येथील मा. जिल्हा न्यायाधीश २ जे. एल.गांधी यांनी आरोपी लहु धुलेश्वर तनपुरे व सुरेश सर्जेराव तनपुरे यांना प्रत्येकी २ वर्षे सश्रम कारावास व ५००० रु दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा सुनावली.त्याचप्रमाणे सर्व आरोपींना भा.द.वि. कलम ३२४,१४३,१४८,१४९ प्रमाणे दोषी धरले.परंतू सर्व आरोपी तर्फे अपराधी परिवीक्षा अधिनियम प्रमाणे चांगल्या वर्तणूकीची हमी देवून सूटका करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे मे. न्यायालयाने सर्व आरोपींची २ वर्षे चांगल्या वर्तणूकीच्या हमीवर भा.द.वि. कलम ३२४,१४३,१४८,१४९ मधून सुटका केली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षास कोर्ट पैरवी अधिकारी ओ.एस.आय. नामदेव नलवडे व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व कोर्ट कर्मचारी मयुर गायकवाड यांनी मदत केली.
No comments:
Post a Comment