पुणे:- मा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख यांनी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास सूचनेप्रमाणे करत असताना मा. पोलीस निरीक्षक अशोक शेळके . यांनी सदरच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके तयार करून व तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास करून तसेच गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट गाडीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यांचे नाव खालील प्रमाणे.
1) अमोल विलास होले वय 25 वर्ष रा. पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे
2) सचिन राजाराम नाळे वय 23 वर्ष मूळ रा.थेरवडी चिलार वस्ती ता.कर्जत जिल्हा अहमदनगर सध्या रा. शिंदे होस्टेल रूम नंबर 3 तांबे नगर ता. बारामती जिल्हा पुणे.
3) जयेश्वर जगन्नाथ मोरे वय 30 वर्ष रा. पोहरेगाव ता. रेनापुर जिल्हा लातूर. यांना दिनांक 21/09/2022 रोजी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सदर गुन्ह्याततील जबरी चोरीस गेलेल्या रकमे पैकी एकुण 28,09,300/- रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार किंमत 3,00,000/- असा एकुण 31,09,300/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.471/2022 भा.द.वी. क 457,380,461 प्रमाणे कुरकुंभ येथे वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी वालचंदनगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई
मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख .मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. गणेश इंगळे .यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके,सहा.पो.नि.बिराप्पा लातुरे, पो.स. ई. श्री.गणेश जगदाळे,पो.स.ई.श्री.अमित सिदपाटील,पो.स.ई.श्री.मेठापल्ली,पो.स.ई.श्री.प्रदीप चौधरी,सहा.फौज बाळासाहेब कारंडे,सहा.फौज रविराज कोकरे,सहा.फौज तुषार पंदारे,पो.हवा. सचिन घाडगे,पो.हवा. राजू मोमीन,पो.हवा. जनार्दन शेळके,पो.हवा. अभिजीत एकशिंगे,पो.हवा. स्वप्निल अहिवळे
,पो.हवा. अजय घुले,पो. कॉ. धीरज जाधव.
पो. कॉ.योगेश नागरगोजे, चा.सहा.फौज.काशिनाथ राजापुरे,पो.कॉ.दगडु वीरकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment