धक्कादायक..60 वर्षाच्या वृद्धाने 7 वर्षाच्या मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून केला बलात्कार..
पिंपरी :- महाराष्ट्रात नक्की काय चाललंय महिला व मुली सुरक्षित नाहीत का?कायदा सुव्यवस्था काय करतंय याचा विचार होतोय का?माणूस कुठल्या थराला जातो हे अनेक प्रसिध्द होण्याऱ्या बातम्यांमुळे कळतं अशीच एक निंदनिय व विकृतीचा कळस गाठला, चक्क चॉकलेटचे आमिष दाखवून एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 60 वर्षाच्या वृद्धाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 20) दीडच्या सुमारास दापोडी येथे घडली आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-24) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम कादर खान(वय 60 रा. दापोडी)याच्यावर आयपीसी 376, 376 (3), 376 (2) (एन),
376 (ए,बी), 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहण्यास आहेत.मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी
घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.मुलीच्या आईने भोसरी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक मनिषा दशवंत करीत आहेत.
No comments:
Post a Comment