*ज्ञानाधी इन्स्टिट्यूट' च्या वतीने गुणवंतांचा सन्मान*
बारामती : - बालपण, तरुणपण व वृद्ध अवस्था या तिन्ही अवस्थेत सुख व दुःख येणार परंतु संघर्षाचा कालावधी प्रत्येकाच्या जीवनात सर्वात जास्त असतो आशा प्रसंगी विचलित न होता ध्येय गाठण्यासाठी 'शिक्षण ' मदत करते त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य वयात शिक्षण पूर्ण करावे त्यामुळे पुढील वाटचाल योग्य पद्धतीने होते असे प्रतिपादन ज्ञानाधी इन्स्टिट्यूट' चे संचालक प्रो सुनील कदम यांनी केले.
ज्ञानाधी इन्स्टिट्यूट च्या वतीने शिक्षक दिनी शिक्षक व प्राध्यपक च्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला भारतीय नौसेना मध्ये कार्यरत असणारा सुमित काळाने, आयनमॅन ओम सावळेपाटील, नीट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी अनुज नलवडे व गोपी गालिंदे आदींचा सन्मान आला.
या प्रसंगी पालक प्रतिनिधी कांतीलाल काळाने, सौ सारिका काळाने,गणेश गालिंदे, सौ मेघा गालिंदे, संजय नलवडे व प्रा अनिल कदम, प्रा संजय बेरड, प्रा शेखर ओव्हाळ आदी मान्यवर उपस्तित होते.
जीवनात दिखाऊ कडे जाऊ नका तर टिकाऊ बना व मोबाईल, सोशल मीडियाचा कामापुरता वापर करा असा सल्ला प्रा अनिल कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या प्रसंगी पालक व विद्यार्थ्यांनी
ज्ञानाधी इन्स्टिट्यूट च्या विविध उपक्रमातून गुणवंत व वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण प्रणाली व अनुभवी शिक्षक प्राध्यापक मुळे यश मिळाल्याचे मनोगत मध्ये सांगितले.
सूत्रसंचालन प्रा शेखर ओव्हाळ यांनी केले तर आभार प्रा अनिल कदम यांनी मानले.
No comments:
Post a Comment