भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्व निमित्त ज्ञान प्रवर्तन अभियानाच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ संपन्न.. बारामती (प्रतिनिधी ):- दि.०७/०९/२०२२ रोजी अकलूज येथील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्व निमित्त परम पूज्य श्री १०८ शुभंकीर्ति महाराजांच्या मंगल सान्नीध् यात २५ व्यां अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रावसाहेब पाटील यांनी संमेलनात केलेल्या संकलपनेनुसार ज्ञान प्रवर्तन अभियानाच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ झाला..याप्रसंगी स्वागत समितीचे गौरवाध्यक्ष डॉ सतीश जम्बुकुमार दोशी यांचा प्रभावना भूषण या उपाधिनी गौरव करण्यात आला.तर अकलूज येथे संपन्न झालेल्या १५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रद्दुम श्रेणिक गांधी याचा सन्मान करण्यात आला..भगवान महावीर मंदिराच्या सभागृहात झालेल्या या समारंभात प.पू.शुभंकीर्ति महाराजांचे त्याग धर्मावर प्रवचन झाले..महाराजांनी डॉ रावसाहेब पाटील यांच्या जैन साहित्य प्रचाराचे कौतुक करून जैन साहित्य /विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविले पाहिजे ..त्यासाठी समाजाने सहकार्य करण्याचे आवाहन केले...डॉ पाटील यांनी मराठी जैन साहित्याचा महाराष्ट्र ,मराठी जैन साहित्य संस्कृती यावर असलेला प्रभाव स्पस्ट करून अहिंसेचे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनुपम वर्णनाची माहिती दिली..डॉ सतीश दोशी याना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या... प्रद्दुमन गांधी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले..महिला मंडळाने मंगलाचरण केले.. या समारंभास बहुसंख्येने श्रावक श्राविका उपस्थित होते.
Post Top Ad
Wednesday, September 7, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्व निमित्त ज्ञान प्रवर्तन अभियानाच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ संपन्न..
भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्व निमित्त ज्ञान प्रवर्तन अभियानाच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ संपन्न..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment