बारामती शहर पोलिसांनी ठोकल्या महिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या... बारामती;- बारामती शहर पोलिसांनी ठोकल्या महिलां वर अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या.
महिला व अल्पवयीन मुलींची तक्रार तात्काळ दाखल करून आरोपींचा कसून शोध घेण्याचे पोलिसांना कायमच वरिष्ठांचे आदेश आहेत आणि तसाच प्रकारे कायदा सुद्धा आहे .
बारामती शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील खालील आरोपींना वेगवेगळी पथके तयार करून अटक करून पोलीस कोठडी ठेवलेले आहे.
आरोपी नामे आदित्य धनाजी गायकवाड वय 20 वर्षे राहणार पानसरे अपार्टमेंट कृष्णाई लॉन्स याने 14 डिसेंबर 21 रोजी बारामतीतीलच एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेले होते त्या दोघांचाही काहीही सुगावा त्या दिवसापासून लागत नव्हता तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण करून सुद्धा त्यांचा ठावठिकाणा मिळत नव्हता त्याची माहिती काढून सदर आरोपीला पुणे शहरातून अटक केलेली आहे . सदर आरोपीवर पोस्को व भादवी कलम 376 प्रमाणे गुन्हा कलमात वाढ करून करून पोलीस कोठडी रिमांड घेतलेली आहे,दुसऱ्या घटनेमध्ये 23 ऑगस्ट पासून स्वतःच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर तिला ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणारा क्षितिज उर्फ ऋतिक सुनील गरड वय 22 वर्षे राहणार जेऊर तालुका करमाळा सध्या राहणार रुई फाटी याला सुद्धा पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली आहे त्याच्यावर सुद्धा पोस्को व 376 अन्वये कारवाई केली आहे.
तिसऱ्या घटनेमध्ये सुजित घाडगे वय 26 वर्ष राहणार बारामती हा इसम एका महिलेवर ओळखीचा फायदा घेऊन तिला काही वर्षापासून मारहाण करणे दमदाटी करणे दुखापत करणे यासारख्या अत्याचार करून तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवले म्हणून सदर आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला सुद्धा अटक केली आहे.
पोस्को गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना माननीय सत्र न्यायाधीश श्री गांधी साहेब व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आतकरे साहेब यांच्यासमोर रिमांड साठी हजर केले आहे या तिन्ही गुन्ह्यांचा तपास व आरोपी अटकेची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे मुकुंद पालवे संध्याराणी देशमुख पोलीस कर्मचारी अंकुश दळवी देवेंद्र खाडे अनिल सातपुते दशरथ कोळेकर तुषार चव्हाण दशरथ इंगोले यांनी केली आहे.अल्पवयीन अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीला तिच्या संमतीने घेऊन जाणे हा सुद्धा गुन्हा आहे. आणि या अल्पवयीन मुलींना फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जर त्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय घेऊन गेला तर या गुन्ह्याला पोस्को कलम लागते . यापुढे पोलिसांतर्फे अशा गुन्हेगारांच्यावर सक्त व तात्काळ कारवाई करणार आहे.
No comments:
Post a Comment