भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी ई-पोस्ट शुभेच्छा पाठवा !!!
पुणे:- भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी ई-पोस्ट ग्रीटिंग्ज पाठवण्यासाठी टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
टपाल विभागाचे पुणे क्षेत्र, भारताच्या गौरवशाली परंपरेला पुढे नेणाऱ्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा संदेश पाठवण्यासाठी एक विशेष ई-पोस्ट सुविधा राबवत आहे. नागरिक त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन ई-पोस्टद्वारे A4 साईजच्या कागदावर स्वहस्ते लिहून किंवा चित्र काढून हा संदेश पाठवू शकतात. हे संदेश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पंतप्रधानांच्या निवासी/अधिकृत/संसदेच्या पत्त्याच्या डिलिव्हरी पोस्ट ऑफिसला पाठवले जातील आणि स्थानिक पोस्टमनमार्फत छापील स्वरूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि तेही फक्त दहा रुपयांत!
पुणे क्षेत्र टपाल विभाग, देशाचा गौरव वाढवणाऱ्या श्री नरेंद्र मोदी जी यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्व जनतेला या अनोख्या उपक्रमाद्वारे आमंत्रित करत आहे.
No comments:
Post a Comment