बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हायड्रॉलिक शिडी बसविण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी..
बारामती : बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती शहर अध्यक्ष निखिल भाई खरात यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायी आभिवादन करण्यासाठी आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीची गरज आहे.सदर निवेदनावर तात्काळ कारवाई करावी.येत्या काळात मागणी पूर्ण नाही झाली तर बारामती नगर परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचे देखील निखिल खरात यांनी सांगितले.
सदर निवेदन देताना भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, संघटनेचे सदस्य विराज (भैय्या) औदुते,समीर खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment