प्रशासकीय भवन मध्ये अधिकारीच नाय?बारामतीत तर रस्त्यातच खड्डे हाय.!दादांना इकडे लक्ष द्यायला वेळच नाय!! बारामती(संतोष जाधव):- महाराष्ट्रात बारामतीचे नाव गाजतेय मग ते राजकीय असो, सामाजिक असो,शैक्षणिक असो, अथवा विकासा बाबतीत असो कोणत्याना कोणत्या कारणास्तव बारामती गाजतेय तर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोटयावधी रुपये निधी आणून बारामतीतील विकास कामे करण्यासाठी प्रयत्न केला पण नुकताच बारामतीत गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आली होती ही कामे नवीन असो की दुरुस्ती चे असो पण ती केली गेली पण पाऊस झाला आणि पुन्हा रस्ते खड्ड्यात गेले जिकडे पाहावे तिकडे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे,ह्या रस्त्याच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले असून वाहन चालकाला याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक अपघात झाले, तर साचलेल्या खड्ड्यात पाणी साठल्याने त्याठिकाणी मच्छर झालेत, डेंग्यू सारखे मच्छर होत आहे त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले याला जबाबदार कोण?असा प्रश्न विचारला जात आहे, ह्या रस्त्याची कामे व डागडुजी ही बारामती नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या मार्फत केली गेली परंतु या कामावर देखरेख करणारे अधिकारी हे त्यावेळी कामे चालू असताना काय करत होते हे आत्ताच्या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्था पाहून कळतंय यामुळे नागरिकांच्यात संताप होत आहे,तर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासकीय भवन बारामती येथे भव्य दिव्य कार्यालय बांधले असून यामध्ये प्रशस्त व सोयीस्कर असे सार्वजनिक बांधकाम ऑफिस बनविले परंतु या कार्यालयात अधिकारी व शाखा अभियंता बसत नसल्याचे दिसून येत आहे तर याठिकाणी कामानिमित्त व तक्रारी बाबत काही काम असेल तर अधिकारी व शाखा अभियंता नसतो असे सांगण्यात आले यामुळे येणाऱ्याला जुने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय पाटस रोड, इरिगेशन गेस्ट हाऊस याठिकाणी जावे लागते ही नागरिकांची होणारी ससेहोलपट कधी थांबणार नवीन ऑफिस असताना जुने कार्यालयात का बसतात?असे प्रश्न येथे येणाऱ्याला पडत असेल कारण जुने ऑफिस मध्ये सदैव अधीकारी व ठेकेदार यांचीच बैठक चालू असल्याचे कळतंय मग अजितदादांनी कोटयवधी रुपये खर्च करून नवीन ऑफिस का बांधले असावे हा प्रश्न पडतो?सद्या बारामती ही खड्डेमय झाली असून अजून किती दिवस या रस्त्यातील खड्ड्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागणार, तर अपघाताला सामोरे जावे लागणार अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. विकास होतो पण तो करत असताना ठराविक ठेकेदाराला कामे दिल्याने इतरांचा होतोय हे विसरून चालणार नाही अश्या ठेकेदाराला कामे देऊन ती कामे निकृष्ट दर्जाचे होत असताना त्याकडे कानाडोळा करणारे यांना जाब कोण विचारणार बारामतीकर हे पाहत असून लवकरच ज्या भागात, प्रभागात,वार्डात रस्त्यावर खड्डे पडले आहे ते तात्काळ बुजवावे अन्यथा लवकरच नागरिकांच्या सहभागातून या खड्ड्यात सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव(पत्रकार) वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले.
Post Top Ad
Friday, September 16, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
प्रशासकीय भवन मध्ये अधिकारीच नाय?बारामतीत तर रस्त्यातच खड्डे हाय.!दादांना इकडे लक्ष द्यायला वेळच नाय!!
प्रशासकीय भवन मध्ये अधिकारीच नाय?बारामतीत तर रस्त्यातच खड्डे हाय.!दादांना इकडे लक्ष द्यायला वेळच नाय!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment