*अन्न व औषध प्रशासनातर्फे गुळ उत्पादकावर कारवाई* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 29, 2022

*अन्न व औषध प्रशासनातर्फे गुळ उत्पादकावर कारवाई*

*अन्न व औषध प्रशासनातर्फे गुळ उत्पादकावर कारवाई* 

पुणे दि. २९: अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो भेसळयुक्त गूळ तर २२ हजार १०० रुपये किंमतीची ६५० किलो भेसळयुक्त साखर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर  कारवाई करताना  या प्रकरणी घेण्यात आलेले दोन्ही नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने विक्रेत्यास २० हजार रुपये तडजोड शुल्क इतका दंड आकारण्यात आला आहे. 

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गूळ उत्पादन करावे. याबाबतीत माहिती असल्यास प्रशासनाच्या  १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment