अज्ञानी यांचं युद्ध ज्ञानाबरोबर झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही - तेजस घोरपडे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 15, 2022

अज्ञानी यांचं युद्ध ज्ञानाबरोबर झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही - तेजस घोरपडे*

*अज्ञानी यांचं युद्ध ज्ञानाबरोबर झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही - तेजस घोरपडे*

    इंदापूर (प्रतिनिधी) - परमेश्वराला पाहता येत नाही आणि तो दिसत नाही हे सुध्दा एक अज्ञानच आहे, अशा अज्ञानीचं युद्ध ज्ञानियांबरोबर झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. असे मत संत निरंकारी मिशनचे प्रचारक तेजस घोरपडे (खटाव - माण) यांनी व्यक्त केले.
    पडस्थळ येथील पटांगणात पाच वर्षीय बालक सिद्धेश्वर बाप्पा कल्याणभाऊ पवार याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने गुरुवारी (ता. १५) निरंकारी मिशनचा सत्संग सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी मुख्य व्यासपीठावरून श्री. घोरपडे बोलत होते.
     या सत्संग सोहळ्यास सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे, पडस्थळ गावातील ग्रामस्थ,तसेच इंदापूर तालुक्यासह बारामती, माळशिरस आदी भागांतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
       आध्यात्मिक जीवन जगत असताना ज्ञान आणि अज्ञान यांच्या मध्ये युद्ध होणं हे नवीन नाही मागील साधू संतांचे जीवन पाहिले तर ज्ञान आणि अज्ञान यांच्यात युद्ध झालेच आहे, असे सांगून श्री. घोरपडे पुढे म्हणाले पाठीमागील साधू संतांना देव दिसतो तर देव दिसायलाच पाहिजे. असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
    संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्याविषयी सांगताना श्री. घोरपडे म्हणाले ज्या विठ्ठलाला नामदेव महाराज सर्वस्व समजले त्याच विठ्ठलानी संत नामदेवांना सांगितले माझं निजरूप पाहायचं असेल तर तुला विशोबा खेचर यांच्याकडे जावे लागेल, हे सर्वांना ज्ञात आहेच.सांगायचं तात्पर्य हे की, देवाला शोधण्यापेक्षा देव दाखवणाऱ्याला शोधा म्हणजे क्षणात परमेश्वराविषयी असलेले भ्रम अथवा अज्ञान दुर होईल.                 
    प्रवचनाच्या शेवटी ते म्हणाले मनुष्य जन्म हा केवळ परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच मिळाला आहे. आणि त्याच्या प्राप्तीशिवाय केलेली भक्ती ही अपूर्णच असल्याचे सांगितले.
    सदर सत्संगचे आयोजन (पांडुरंग तात्या मारकड मा. उपसभापती, मार्केट कमिटी इंदापूर) व मित्र परिवार व कल्याण भाऊ पवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार पडस्थळ सत्संगचे प्रबंधक पोपटदादा वाघमोडे यांनी केले, तर मंचसंचालन नवनाथ माने

No comments:

Post a Comment