आदर्श शिक्षक बळीराम शिवराम गायकवाड गुरुजी;
लातूर:- जिल्ह्यातील अनेक लोकांना मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जणांना क्रांतिकारी शिक्षक म्हणून उजेड देणारे व शैक्षणिक समुपदेशनाची वाट दाखवणारे आणि मराठवाड्याच्या भूमीमध्ये लातूर जिल्हयामध्ये निलंगा तालुक्यातील कासार शिरसी या गावी जन्म घेणारे एक महान क्रांतिकारी शिक्षक म्हणून बळीराम (दादा) शिवराम गायकवाड यांना ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराने गुरुजी प्रभावी झाले होते जाती व्यवस्थेने लाभलेल्या गुलामगिरीला जातीप्रथेला काढून शिक्षणाचे महत्व ओळखणारे गुरुजी तूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरशी या छोट्याशा खेड्यामध्ये अठरा विश्व दारिद्र असणाऱ्या दलित समाजात शिवराम गायकवाड व मंडाबाई गायकवाड या कतृत्वान दांपत्याच्या पोटी बळीराम (दादा) गायकवाड गुरुजी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1930 रोजी झाला जाती व्यवस्थेने ठरवून दिलेल्या विषमतेमुळे गरिबी दारिद्र्यात राहणं जगणं प्रस्थापितांची सेवा चाकरी करणे आणि मरण हे ज्यांच्या अनेक पिढ्यांनी पाहिलं अनुभवलं आणि केलं तशीच दारिद्र्य परस्थिती शिवराम गायकवाड यांच्याही वाट्याला आली होती मोलमजुरी करून जगणं आणि कुटुंबाला जगविणं आणि गरीबीत पुढे जीवन ढकलत जाणे असा दिनक्रम त्यांचा होता अशाही परिस्थितीत कर्तृत्व करण्याची संधी गुरुजीना मिळाली होती. कर्तृत्व आताच्या परिस्थितीत भले छोटे असो परंतु या काळातील क्रांतिकारी बदलाची जाणीव करून देणारं गुरुजींचा शैक्षणिक कार्य होते. त्याची चाहूल गुरुजीच्या बुद्धीला हेरत होती. वडील शिवराम गायकवाड यांनी शिक्षणाचे महत्व हळूहळू मुलगा बळीराम राम (दादा) गायकवाड यांना दिले. त्या काळामध्ये पंढरीनाथ गायकवाड गुरुजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार शिवराम गायकवाड यांना समजावून सांगितला आणि त्या विचाराला उराशी बाळगून बळीराम गायकवाड गुरुजी हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. तेव्हा वय जास्त असल्याचे कारण सांगून प्रवेश मिळत नसल्याचे लक्षात येतात वय कमी करून बळीराम गायकवाड यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्याकाळी बळीराम गायकवाड यांना शाळेत प्रवेश मिळाला. तेव्हा वर्गात बसण्याची शिवा शिव पाळण्याची ऑजळीने पाणी पिण्याची जातीवादी पद्धत होती शिक्षक विद्यार्थ्यांना दुरूनच छड़ी मारत जातीव्यवस्थेचा प्रचंड मोठा पगडा समाजात होता अशा परिस्थितीत वडिलांनी शिक्षणाच्या संधीचा मिळून दिलेला फायदा गुरुजींनी पुरीपुर आयुष्यामध्ये उचलता आणि अशा पद्धतीने गुरुजी आपल्या जीवनामध्ये आदर्श शिक्षक यशस्वी झाले गुरुजीना बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः गुरुजींना बळीराम या नावाने पुकारत असत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सहवास बळीराम(दादा) गायकवाड गुरुजी यांना मिळाला खरोखरच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले बळीराम शिवराम गायकवाड यांनी उपेक्षित; भटक्या; विमुक्त जाती; जमाती ;अठरापगड जातीच्या लोकांना सामाजिक न्याय व हक्क मिळवून देण्याच्या करता त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण सेवा कार्य केले आहे .नव्या पिढीपर्यंत शिक्षणाचा विकास झाला पाहिजे शिका; संघटित व्हा; संघर्ष करा; हा बाबासाहेबांचा विचार बळीराम( दादा) शिवराम गायकवाड गुरूजी यांनी सर्वसामान्य लातूर जिल्हयातील नवीन त्या काळामध्ये निजामाच्या कालखंडामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळी सुद्धा एक जबरदस्त एक सामाजिक परिवर्तन करण्याचे महान कार्य केलं म्हणून गुरुजी एक आदर्श शिक्षक होते. 1971 रोजी गुरुजींना 73 रोजी गुरुजींना अंबुलगा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे जिल्हा परिषद शिक्षकाची नोकरी एकविसाव्या वर्षी मिळाली. त्या काळामध्ये गुरुजींना शिक्षणाचे सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे तळागाळातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिक करण्याचे महान कार्य गुरुजींच्या काळामध्ये केलं आज जर आपण पाहिलं पाहिलं तर जिल्हा परिषदेची प्राथमिक शिक्षक एक आदर्श शिक्षक म्हणून गुरुजींकडे पाहिलं जातं एक निष्ठावंत शिक्षक अंबुलगा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे सातत्यपूर्ण सेवा केली सेवा करत असताना भटक्या विमुक्त जाती जमातीतले गोरगरीब विद्यार्थी शिकले पाहिजे गोरगरिबाची मुलं • शिकली पाहिजेत प्रसंगी गुरुजींनी विमुक्त जाती जमातीतील घिसाडी; वडार पाथरूट ; पारधी;नाथजोगी अशा समाज घटकातील कार्यकत्यांशी संपर्क साधून त्या काळामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचं भटक्या विमुक्त जाती जमातीच्या न्याय व हक्काच्या प्रश्नाच्या साठी अहोरात्र कष्ट केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भटके विमुक्त समाजाला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवण्यात सर्वाधिक मोठे योगदान होतेच .शिवाय भटक्या विमुक्त जातीसमाज घटकाच्या सर्वार्थाने विकासाच्या प्रवाहामध्ये हा समाज येत नव्हता त्या काळात सर्वात मोठे भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेबआंबेडकरांचा सहवासात रहाण्याचा योग व संविधानाच्या शिल्पकाराला भेटण्याचे भाग्य बळीराम (दादा) शिवराम गायकवाड गुरूजी यांना मिळालं वास्तविक पाहता बळीराम(दादा) शिवराम गायकवाड गुरुजी यांना आम्हाला पाहण्याची संधी प्राप्त झाली नाही परंतु आज एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे लातूर जिल्हयाच्या निलंगा तालुक्यामध्ये त्यांचं नाव आदर्श शिक्षक म्हणून मानाने घेतले जाते.आज शिक्षक दिन आहे सर्वपल्ली राधाकृष्णन याचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो .परंतु आज मी खऱ्या अर्थाने चौदाव्या लोकसभेचे माजी खासदार डाॅ. सुनील बळीराम गायकवाड यांचे वडील कै. बळीराम (दादा) शिवराम गायकवाड यांच्या सर्वार्थाने मला पाच जून 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी आज प्रकर्षाने आठवण येते प्रज्ञा सूर्याच्या सावलीतील एक प्रज्ञावंत शिक्षक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा संघर्ष करा हा न्याय या न्यायप्रणालीप्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्याच्यासाठी लातूर शहरांमध्ये त्या काळामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांच्या चळवळीमुळे गायरान जमिनीच्या संदर्भात गुरुजींनी अनेक वेळा आंदोलन केलं त्या काळामध्ये इंदिरानगर हरंगुळ; बाबुळगाव;शिखरदरपुर अशा ठिकाणी वडार समाजाला स्वतःच्या पायावर उभा करण्याची महान चळवळ उभी करून लातूर शहरांमध्ये त्यांच्या स्थिरस्थावर करण्याच्या साठी गुरुजींनी मदत केली लातूर आणि लातूर शहराच्या परिसरामध्ये तरुणांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून त्यांनी सकारात्मक चळवळ उभी केलेली
आपल्याला पाहायला मिळते आज त्यांची सुपुत्र खासदार सुनील गायकवाड दुसरे त्यांचे सुपुत्र अनिल गायकवाड गुरुजींनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याचा आदर्श ठेवा सातत्याने पुढे चालवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं या जगामध्ये अनेक माणसं होऊन गेली परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वाणीतून ज्यांचं नाव घेतलं ते आदरणीय बळीराम दादा शिवराम गायकवाड खरंच बाबासाहेब आंबेडकर यांना बोलले होते.ते सहवासात ते राहिले.व जीवनाचे सार्थक केले
देशातील संसद व संविधान समितीचा प्रत्येक शब्द चिरेबंद झाला तो इतिहास खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पाऊल खुणा ठरतात या महामानवाच्या वाणीतून ज्यांचं नाव निघालं ते सर्वार्थाने गुरुजीसारखी माणसं धन्य झाली त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये आमच्यासारख्या लोकांचं त्यांना सहवास मिळण्याचे सुभाग्य मिळते यापेक्षा आंबेडकर चळवळीचे यश काय असू शकेल ?ज्या काळात देश स्वतंत्र झाला होता तेव्हा मराठवाडा गुलामांचा गुलाम होता. इंग्रजांचा गुलाम निजाम निजामाचे गुलाम मराठवाड्यातील लोक त्यातही अस्पृश्य दलित समाजाचे सर्वाधिक भटक्या जाती जमातीचे लोक अशा चौपदरी गुलामगिरीच्या भागात ज्यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने चालण्याची मोठी हिम्मत दिली त्या प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूर्यरूपी नंदादीप तेवत ठेवण्याचे महान शैक्षणिक कार्य बळीराम (दादा) गायकवाड गुरूजी यांनी केले आहे. मराठवाड्याच्या चळवळीतील एक महत्वपूर्ण सोनेरी अक्षरांमध्ये लिहिणार नाव ठरलं म्हणून निजामाच्या काळात बिदर नंतर उस्मानाबाद आताचा लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील या कासार शिरशीच्या छोट्याशा खेड्या मध्ये 18 विश्व दारिद्र असणाऱ्या कुटुंबात गायकवाड गुरुजींचा जन्म झाला अशा पद्धतीने अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या गायकवाड परिवारामध्ये शिक्षणाचे महत्त्व ओळखण्याचे महान कार्य गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये केलं बाबासाहेब आंबेडकरांचे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि अस्पृश्यता विरुद्ध आवाज उठवणे आपण स्वतः शिकलो तर समाज प्रगतिशील बनवू शकतो हा महान विचार पेरला: तू पासला आणि अशा पद्धतीने गुरुजींनी फार मोठं क्रांतिकारी या काळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळते आज गुरुजी जरी आपल्यात नसले तरी एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या आम्हाला कायम आठवण व अभिमानाची गोष्ट राहत जाईल. आज त्यांची सुपुत्र सन्माननीय खासदार डॉ. सुनील गायकवाड साहेब आणि अनिल गायकवाड साहेब आपल्या वडिलांच्या शैक्षणिक विचाराचा आणि वसा आणि वारसा पुढे सातत्याने चालवत आहेत मला यानिमित्ताने खासदार सुनील गायकवाड यांना जाहीरपणे नम्र विनंती करावीशी वाटते की आदर्श शिक्षक थोर स्वातंत्र्य सेना सेनानी बळीराम शिवराम गायकवाड कला संस्कृती साहित्य अकादमी ही त्यांच्या नावाने व्हावी अशा प्रकारची शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी त्यांना जाहीर अशा पद्धतीचं आवाहन करत आहे गुरुजींच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वसा आणि वारसा हिंदुस्थानातील जोपासना हिंदुस्थानातील सर्व उपासना हिंदुस्थानातील सर्व शिक्षकांना व्हावी त्याने केलेल्या सामाजिक कला संस्कृती साहित्य अकादमी यांच्या नावाने निघून देश विदेशातील असामान्य कर्तृत्व आणि गुण असणाऱ्या व्यक्तींच्या नावे सन्माननीय बळीराम गायकवाड कला संस्कृती साहित्य अकादमीच्या नावाने एक राष्ट्रीय स्तरावरची अकादमी या निमिताने खा. सुनिल गायकवाड दादा यांच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील मुख्य मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आणि असेच गुरुर्जीचे शैक्षणिक समुपदेशनाची घडे आम्हाला पुढच्या कालखंडात म्हणजे मिळत जाऊ गुरुजींनी चालवला शैक्षणिक विकासाचा वसा आणि वारसा जपण्याचा पवित्र कार्य या अकादमीच्या माध्यमातून आम्ही करू
एवढेच या निमित्ताने पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपलं जाहीर मत प्रकट करत आहे माननीय सुनील गायकवाड साहेब यांनी या आमच्या विचाराचा याठिकाणी सन्मान करून बळीराम शिवराम गायकवाड कला संस्कृती साहित्य अकादमी राष्ट्रीय पातळीचे अकादमी स्थापन करावी त्या माध्यमातून देशातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांना या अकादमीच्या नावाने गौरवता येईल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देता येईल त्यामुळे त्यांच्या नावाची प्रेरणा समाजामध्ये जनमानसामध्ये विकसित होण्यास मदत होईल एवढेच या निमिताने शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदरणीयबळीराम गायकवाड गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि त्यांचे शिक्षक दिनाच्या निमिताने स्मरण करतो. प्रा. गोरख साठे,बारामती 9833661268
No comments:
Post a Comment