आमदार राम शिंदे यांनी केला बारामती लोकसभा जिंकण्याचा शिक्कामोर्तब.. बारामती(संतोष जाधव):-नुकताच बारामती मध्ये आमदार राम शिंदे प्रभारी लोकसभा बारामती यांचा दौरा झाला या दौऱ्यादरम्यान दि.6 सप्टेंबर रोजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा असून या दौऱ्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारमण लवकरच बारामती तालुक्याच्या
दौऱ्यावर येणार आहेत,याचे नियोजन व कार्यकर्ते बैठक आढावा घेणार असल्याने तत्पूर्वी बारामती मध्ये आमदार राम शिंदे आले होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी पत्रकारांना बोलताना सांगितले, दौऱ्यावरुन भाजप
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जोरदार
तयारीला लागल्याचे सुतोवाच आहे.भाजप नेते राम शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला देखील टोला
लगावला.'A म्हटलं की अमेठी आणि B म्हटलं
की बारामती, अमेठीचा कार्यक्रम केला आहे, पण
आता बारामतीचा कार्यक्रम करायचा आहे', असं
सूचक विधान राम शिंदे यांनी केलं आहे.
"A म्हटलं की अमेठी B म्हटलं की बारामती A चा कार्यक्रम 2019 लाच केलाय. 2019 ला
बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो 2024 ला
करायचा आहे. त्याच्यासाठीच 18 महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. आणि हे नियोजन असे तसे नसून देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. देशाच्या अर्थमंत्री राज्यात येवून त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येईल. ही निवडणूक जिंकायचीच आहे, असं राम
शिंदे म्हणाले.दिवस बदलतात पावसाळा झाला की हिवाळा येतो आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो.परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही", असं सूचक विधान राम शिंदे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्वोतोपरी प्रयत्न
सुरु आहेत. त्यासाठी भाजपने अनेक दिग्गज
नेत्यांना कामाला लावलं आहे. विशेष म्हणजे
त्याच ध्येयातून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या
बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.राज्यात शिवसेना हा मोठा पक्षांपैकी एक होता.पण शिवसेनेत फूट पाडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपपुढे कडवं आव्हान ठरु शकतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवाराला पराभव करण्याचा भाजपचा डाव आहे. पवार कुटुंबातील दिग्गज नेत्याचा बारामती मतदारसंघातून पराभव केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होईल, असा भाजपचा डाव आहे.दुसरीकडे राम शिंदे यांनी अमेठीचा उल्लेख करण्यामागे देखील महत्त्वाचं कारण आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. त्यांचा अमेठीमधील पराभवावरुन भाजपने काँग्रेसला अनेकदा डिवचलं आहे.त्यातूनच आज राम शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली,या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, 2019 ला कोणालाही वाटले नव्हते अमेठीमध्ये राहुल गांधी पराभूत होतील.मात्र, भाजपने ते करून दाखवले. आता 2024 ला बी फॉर बारामतीचे मिशन हाती घेतले आहे. यासाठीच
देशाच्या अर्थमंत्री 22, 23, व 24 सप्टेंबरला बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती दिली. बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणाऱ्या निर्मला सीतारामन याचे बारामती मध्ये भव्य दिव्य स्वागत केले जाईल, तसेच त्यांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले
जातील. असे आश्वासन शिंदे यांनी देले.
या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व अविनाश मोटे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व निर्मला सीतारामन यांच्या दौरा नियोजनाची माहिती दिली. यावेळी किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे,बाळासाहेब तात्या गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन काका तावरे, दिलीप खैरे, तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, शहर अध्यक्ष सतीश फाळके,सचिन साबळे व इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment