*सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या तीव्र निदर्शनांसह मोर्चाने समाज कल्याण आयुक्तालयाची उडाली दाणादाण*
पुणे:- दि.15 सप्टें 2022, गुरुवार, रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र कार्यालय, पुणे येथे मा.ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष मा.महेश भारतीय सर यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र स्वरूपांच्या निदर्शनांनसह धरणे आंदोलन करण्यात आले.
सन 2019, कोविड 19 पासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीग्रहांचे प्रश्न, इ.बी.सी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, विशेष अनुदानाची पुरस्काराची रक्कम, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, परदेशी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे बाबत अशा विविध प्रश्नांवर तसेच इयत्ता अकरावीचे प्रवेश हे आरक्षणाच्या आराखड्याप्रमाणे काटेकोर पालन करून करण्यात यावेत, यांसह विविध विद्यार्थी प्रश्नांवर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्यभरातून शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधी आलेले.
"मागण्या मंजूर न झाल्यास आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्यात बिलकूल फिरू देणार नाही" असा इशारा प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय सर यांनी दिला. आंदोलनात "सामाजिक अन्याय विभाग, येथे अन्याय करून मिळेल" स्वाधार, स्कॉलरशिप ची रक्कम त्वरित जमा करा. असे बॅनर झळकले.
आंदोलनात युवा आघाडीचे राजेंद्र पातोडे, अक्षय बनसोडे, आशोक सोनोने, सम्यकचे प्रतिक साबळे, राजू खरात, राजकुमार दामोदर, ओंकार कांबळे, प्रतीक कांबळे, हंसराज खूने, शमा सुर्यवंशी, अविनाश लहाडे, सोमनाथ शिंदे, सुजल कांबळे, जानव्ही शेलार, महासचिव कौस्तुभ ओव्हाळ, विनय दामोदरे, संघर्षा संखद, अक्षय गोटेगावकर यांसह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले अशी माहिती बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिली.
No comments:
Post a Comment