*बारामती लोकसभा ताकतीने लढवणार महादेव जानकर *
बारामती:- येथे बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम बारामती येथे संपन्न झाला या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वन बूथ टेन युथ या संकल्पनेनुसार पक्षाचे विस्तार वाढ प्रत्येक बूथपर्यंत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या हेतुने काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल,कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथ वर दहा दहा माणसे तयार केली पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, या वेळेस काही पदाधीकारी यांच्या निवडी करण्यात आल्या या कार्यक्रमास, जेष्ठ नेते पंडीत बापु घोळवे यानी बुथ रचना बंधनी संदर्भात कार्यकर्ते यांच्या कडून लेखी स्वरूपात आश्वासन घेतले,तसेच प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ शेवते मुख्य महासचिव माऊली सलगर, यांनी मार्गदर्शन केले, यावेळेस जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे,
गिरीधर ठोंबरे, चंद्रकात वाघमोडे,मच्छिंद्र लकडे,शैलेष थोरात, विठ्ठल देवकाते, महादेव कोकरे, दादा भिसे, अरविंद देवकाते,आविनाश मासाळ, अक्षय टकले,संभाजी चव्हाण,शाम घाडगे ,किशोर सातकर आदी पदाधिकाऱी व कार्यकर्ते उपस्थित होते,
या वेळेस *राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुकाध्यक्ष पदी अँड.अमोल गुलाबराव सातकर यांची फेर निवड झाली*
त येणाऱ्या काळात बारमती विधानसभा मतदार संघा मधे बुथ यंञणा मजबुत राबवून,महादेवराव जानकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल या साठी ताकदीने प्रयत्न करणार आहोत असे मत अँड.अमोल सातकर यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment