माळेगाव पोलीसाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डी जे विरहित पारंपारिक वाद्य मध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 5, 2022

माळेगाव पोलीसाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डी जे विरहित पारंपारिक वाद्य मध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक..

माळेगाव पोलीसाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डी जे विरहित पारंपारिक वाद्य मध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक..                             माळेगाव:- गणेश उत्सव २०२२ अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांची माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर यांनी ठिक ठिकाणी शांतता बैठक घेवून यंदाचा गणेश उत्सव भक्तिमय व शांततेच्या वातावरणात पार पडण्याकरिता व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून  सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून जल प्रदूषण होवू नये या करिता इको फ्रेंडली श्री.गणेशमूर्ती स्थापना करणेस, तसेच श्री गणेश विसर्जन मिरवणूक मधील अनावश्यक खर्च कमी करून त्याऐवजी आरोग्य तपासणी - रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांकरिता विविध शालेय क्रीडा स्पर्धा, समाजप्रबोधनात्मक संदेश- देखावा, डी जे विरहित पारंपारिक वाद्य मध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांची त्यांचा कार्याची पडताळणी करून गुणांच्या आधारे माळेगाव पोलीस स्टेशन वतीने श्री गणराया सेवा पुरस्कार साठी निवड करून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्री.गणेश मंडळ पदाधिकारी यांचा पुढील वर्षी वरिष्ठ  अधिकारी यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करणार असले बाबतची माहिती देवून जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होवून खऱ्या अर्थाने सेवाभावी वृत्तीने श्री.गणेश उत्सव साजरा करणे बाबत केलेल्या पो.नि.श्री.अवचर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मौजे माळेगाव बु || नगरपंचायत ता.बारामती हद्दीतील श्री.संभाजीराजे प्रतिष्ठान संभाजीनगर या सार्वजनिक गणेश मंडळाने आज दिनांक ०५/०९/२०२२ रोजी सकाळी  विसर्जन मिरवणुकीतील अनावश्यक खर्च कमी करून मौजे माळेगाव शहर मधून शांततेत व पारंपरिक वाद्य मध्ये मिरवणूक काढत उर्वरित बचतीच्या रक्कमेतून गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांना ऐन गणेश उत्सव काळात श्रीक्षेत्र गणपती पुळे जि.रत्नागिरी येथे देवदर्शन कार्यक्रम आयोजन करून पारंपरिक वाद्य मध्ये शांततेत मिरवणूक काढण्यात आली याबद्दल श्री.संभाजीराजे प्रतिष्ठान या सार्वजनिक श्री.गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री.अमित विजयराव तावरे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांचा माळेगांव इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेशद्वार समोरील बाजूस गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा देत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून पोलीस उपनिरीक्षक श्री.देविदास साळवे यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे.
         यावेळी  पो.ना.ज्ञानेश्वर सानप (गोपनीय विभाग), पो. कॉ.नितीन कांबळे, पो. कॉ.संदीप वाघमोडे, होमगार्ड रमजान डांगे यांच्यासह बहुसंख्य मंडळ कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment