बौद्ध मातंगांना जोडणारा दुवा हरपला
स्व. हनुमंत साठे यांना बारामतीत भावपूर्ण श्रद्धांजली
बारामती- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते तथा आरपीआय मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सो स्वर्गीय हनुमंतराव साठे यांच्या निधनाने बौद्ध व मातंग यांना जोडणारा दुवा हरपल्याची भावना शोकसभेत विविध वक्त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
दिवंगत नेते हनुमंत साठे यांच्या निधना झाल्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येथील आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
विविध संघटनांच्या,व्यक्तीनी आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय नेते हनुमंतराव साठे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रिपब्लिकन पक्षाचे सुनील शिंदे, विक्रम दादा शेलार, रवींद्र सोनवणे, रत्नप्रभा साबळे, मयूर मोरे राष्ट्रवादी पक्षाचे साधू बल्लाळ, विशाल जाधव,आप्पासाहेब अहिवळे, युवा पँथर संघटनेचे गौरव अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब साळवे आदींनी यावेळी दिवंगत नेते हनुमंत साठे यांच्या आठवणींना उजाळा मनोगत व्यक्त केले.
यावेळी विक्रांत आढाव, संजय वाघमारे , अभिजीत कांबळे, ऍड सोमनाथ पाटोळे, नंदू खरात, मुरलीधर जगताप, अनिल मोरे पत्रकार लक्ष्मण भिसे, उमेश दुबे, संतोष जाधव, दशरथ मांढरे, शुभम गायकवाड, अमोल इंगळे, आदींसह विविध सामाजिक संघटनांचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment