*१४० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान !*
अंथूर्णे (प्रतिनिधी) :-‘आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन अंथूर्णे येथे १४० निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.
संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे शाखेच्या सत्संग भवनात, रविवारी (ता. ४) रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच येथील आजुबाजुच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चांदूलाल सराफ बारामती या रक्तपेढीने रक्त संकलन केले. अंथूर्णे शाखेचे प्रमुख महादेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बारामती क्षेत्राचे संचालक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment