बारामती:- हल्ली सोशल मीडियावर काही व्हिडिओ लहान मुलाला अपहरण करतानाचे फिरत आहेत आणि ते स्थानिक सोशल मीडिया ग्रुप वर फॉरवर्ड करून याला सदरचे व्हिडिओ व फोटो आपल्या भागातीलच असल्याबाबतचे कॅप्शन देऊन ते स्थानिक लोकांच्या मध्ये पसरले जातात. त्यामुळे स्थानिक लोकांच्या मध्ये घबराहट पसरत आहे. तरी या प्रकारे लूटपाट करणारी किंवा लहान मुलांना अपहरण करणारी कोणतीही टोळी बारामती तालुक्यात शहरात आलेली नाही अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. या प्रकारचा व्हिडिओ मेसेज फोटो जर आपल्याला आपल्या लोकल भागाचे कॅप्शन देऊन फॉरवर्ड करून आपल्याकडे आला तर आपण तात्काळ पोलीस ठाण्याला कळवावे किंवा आपण डायल 112 सुद्धा कळवावे.आपल्या गावामध्ये कुणी अनोळखी इसम किंवा लोक दिसून आल्यास आपण सदरबाब तात्काळ पोलीस पाटलाला कळवावी किंवा डायल 112 ला कळवावी किंवा पोलीस ठाण्याची संपर्क करावा. सदर व्यक्तींना कोणत्याही प्रकारे विना चौकशी मारहाण करू नये. यातून सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.अशा मेसेज बाबत आपण स्थानिक पोलीस ठाण्याकडून खातरजमा करून घ्यावी तो तुमचा अधिकार आहे. परंतु अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.बारामती मध्ये कोणत्याही लहान मुलाला अपहरण केले बाबतची नोंद झालेली नाही.
सावधान..मुले पळवणारी चोऱ्या करणारी टोळी परिसरात आल्या बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये..
No comments:
Post a Comment