बारामती नगर परिषदेकडून माहिती अधिकार दिवस साजरा..
बारामती:- माहितीचा अधिकार अधिनियम,
2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. तसेच 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतूदी आणि कार्यपद्धतींना व्यापक प्रसिद्धी दिली जाते. यामुळे बारामती नगरपरिषदेने माहिती अधिकार दिवस साजरा केला आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज, 28 सप्टेंबर 2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम, 2005 संबंधी प्रशिक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.या एकदिवसीय प्रशिक्षणामधे अॅड प्रणिता जावळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच अॅड धिरज लालबिगे व अॅड मिनल भंडारे यांनी देखील उपस्थिताना मार्गदर्शन केले.त्यावेळी उपस्थितांचे प्रश्न मंजूषेचे देखील सत्र पार पडले. ह्या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिक्षक अश्विनी अडसूळ मॅडम यांनी यशस्वीरित्या पार पाडले. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख आरती पवार, मुटकले मॅडम यांनी प्रास्तविक केले व आभार भांडार विभागाच्या स्नेहल घाडगे मॅडम यांनी मानले.
No comments:
Post a Comment