कलर व ब्लॅक बेल्ट डिग्री परिक्षेमध्ये कदम व गोलांडे यांनी बारामतीच्या वैभवात एक शिरपेच लावला. बारामती : बारामती मध्ये दि.04 सप्टेंबर 2022 रविवार रोजी राष्ट्रीय स्तरावरील "युनिक स्पोर्ट्स अँड शोटोकान कराटे डो आसोशिएशन" बारामती शाखेच्या झालेल्या कलर व ब्लॅक बेल्ट डिग्री परिक्षे मध्ये कु.ओम अनिल कदम व कु.,उत्कर्ष शरद गोलांडे यानी ब्लॅक बेल्ट 1st दान (डिग्री) तसेच कु.पार्थ संजय पवार याने ब्लॅक बेल्ट 2nd दान मिळवून बारामतीच्या वैभवात एक शिरपेच लावला आहे.
ओम कदम,उत्कर्ष गोलांडे व पार्थ पवार यांनी अनुक्रमे 4-6 वर्ष कराटे या मार्शल आर्ट प्रकारात सातत्य राखून सराव करून आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे असे संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक व गेली 26 वर्ष कराटे या खेळात पारंगत असलेले व राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाचा अनुभव असलेले शिहान गणेश भिमराव जगताप यांनी सांगितले तसेच उत्तीर्ण झालेल्या मुलांचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव,श्री.बिरजू मांढरे, श्री.प्रशांत शिंदे पाटील,अतुल शेठ गोटे,ऍड.शीतल देशमुख,ऍड.धिरज पोतेकर,रामचंद्र तांदळे,प्रशांत गाढवे व रजनीकांत नकाते यांनी उत्तीर्ण झालेल्या मुलांनचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
No comments:
Post a Comment