कोविड काळात वैद्यकीय सहायक,आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या सह इतर कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांसाठी मोठा दिलासा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 12, 2022

कोविड काळात वैद्यकीय सहायक,आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या सह इतर कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांसाठी मोठा दिलासा..!

कोविड काळात वैद्यकीय सहायक,आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या सह इतर कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांसाठी मोठा दिलासा..!                                                           
मुंबई : कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णाची सेवा केली गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने
आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये वैद्यकीय सहायक,आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी
सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. अशी
कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असेही ठरले.

No comments:

Post a Comment