महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे कौतुकास्पद: संदीप जगताप
बारामती :- गृहणी, शेतामध्ये काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणे हे कौतुकास्पद असल्याचे बारामती तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमन संदीप जगताप यांनी प्रतिपादन केले.
श्री गणेशोत्सव तरुण मंडळ पाच भाई वस्ती,सगोबाचीवाडी (बारामती तालुका ) यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर व ग्रामपंच्यात कुरणेवाडी च्या वतीने बसविण्यात आलेल्या 'हायमास्ट दिवे' च्या उदघाटन प्रसंगी ते संदीप जगताप बोलत होते.
या प्रसंगी संदीप घोरपडे, संग्राम भापकर, जीवन जगताप, अनिकेत घोरपडे, अजित भापकर, संदेश भापकर, अभिषेक जगताप, सिद्धार्थ जगताप, व गणेश भापकर व कुरणेवाडी ग्रामपंच्यात सदस्या वंदना माने, मंगल चव्हाण आदी मान्यवर उपस्तित होते.
श्री अनिल सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा कार्यक्रम मध्ये महिलांनी खेळ, मनोरंजन, उखाणे, म्हणी, चित्रपटातील गीते, नृत्य, प्रश्न मंजुषा आदी चा आनंद घेत विविध बक्षिसे मिळवली व होम मिनिस्टर कार्यक्रम चे आयोजन केल्याबद्दल आयोजक श्री गणेशोत्सव तरुण मंडळ पाचभाई वस्ती यांना महिलांनी धन्यवाद दिले
प्रथम क्रमांक लता जगताप, द्वितीय क्रमांक प्रियंका जगताप, तृतीय क्रमांक सोनाली जगताप व उत्तेजनार्थ राणी जगताप, हेमा भापकर, वैशाली जगताप, वर्षा जगताप, शोभा वाबळे पैठणी व ट्रॉपी पटकवली.
बेटी बचाव, पढाओ व बहीण भाऊची नाते दर्शवणारे गीते सलीम सय्यद यांनी गायली.
नेहमी च्या रुटीन मध्ये जगताना होम मिनिस्टर मध्ये भाग घेतल्याने कला, गुण सादर करता आल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले.
आभार संदीप घोरपडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment