*शाहू हायस्कूल मधील श्री सुजित कुमार जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
बारामती:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथील श्री सुजित कुमार मोहन जाधव यांना बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेल यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला यानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापू सातव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे प्राचार्य मा. श्री बी. एन. पवार साहेब यांच्या हस्ते शाल बुके आणि सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी हायस्कूलचे उपप्राचार्य पी. एन. तरंगे पर्यवेक्षक व श्री बी. ए .सुतार सर आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्काराविषयी बोलताना श्री सुजितकुमार जाधव यांनी मा. प्राचार्य पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर आणि सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचा या पुरस्कारामध्ये महत्त्वाचा वाटा आहे असे मनोगत व्यक्त केले व त्यानिमित्ताने सर्वांचे आभार मानले विद्यालयाचे प्राचार्य बी.एन.पवार साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रथमतः आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सुजित कुमार जाधव यांचे अभिनंदन केले त्यांचे विषयी बोलताना विद्यार्थ्यांसाठी सतत झटणारे प्रत्येक खेळासाठी मोलाचे योगदान देणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये रमणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक यांना बारामती तालुका शहर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल यांच्या वतीने आदर्श पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांचे शाहू हायस्कूल संकुलाच्या वतीने अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आर. एस. टेके यांनी केले तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. बी.एन.सुतार सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment