त्या रात्री नक्की काय घडलं?लाखाचे झाले बारा हजार..जुगार कारवाईत झाला 'गोलमाल'....!
रत्नागिरी:- लाखाचे झाले बारा हजार जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत झालेला प्रकार आला उघडकीस याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील मुरूगवाडा येथे मध्यरात्री जुगार अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी धाड टाकली.मध्यरात्री झालेल्या या कारवाईत गोलमाल झाला असून नक्की काय घडलं त्या रात्री?याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. जुगार कारवाईत झालेल्या गोलमालची बातमी एका दैनिकाने प्रसिध्द करताच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी गंभीर दखल घेतली असून जुगारावरील कारवाईची चौकशी उपविभागीय पोलीस
अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.काही दिवसांपूर्वी मुरूगवाडा येथील जुगारावर मध्यरात्री सवा वाजता रत्नागिरी शहर पोलिसांनी धाड टाकून धडाकेबाज कारवाई केली. मात्र कारवाईत 'अशीही बनवाबनवी' करत बंगल्यात सुरू असलेला जुगार झोपडपट्टीत सुरू असल्याचे दाखवले. जुगारात लाखो रूपयांची उलाढाल असताना कारवाईत केवळ 44 हजार रूपये दाखवत गोलमाल केला. हा गोलमाल काही पचला नाही तो काही दिवसात उघडकीस आला.
विशेष म्हणजे जुगारावरील कारवाईत पोलिसांना
एकही मोबाईल किंवा गाडी सापडली नाही. जुगार खेळणारे सर्व पादचारी होते का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ही कारवाई मध्यरात्री झाली. नक्की काय घडलं रात्री? याबाबत रत्नागिरीच्या नाक्यानाक्यावर चर्चा सुरू रंगली आहे.या जुगार अड्ड्यावरील कारवाईतील गोलमाल प्रकरणाची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी गंभीर दखल घेतली असून जुगारावरील कारवाईची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवली असल्याने अनेकांची पुरती धांदल उडाली आहे.
No comments:
Post a Comment