अष्टविनायक मंडळाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार..
बारामती:- वसंतनगर बारामती येथील श्री अष्टविनस्यक गणेशोत्सव मित्र मंडळ व ओंकार भैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने शासकीय सेवेत उल्लेखनीय सेवा बजावणारे अधिकारी/कर्मचारी तसेच उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये महसूल व वनविभागतील उत्कृष्ट लिपिक पुरस्कार विजेते स्वप्निल जाधव,जलसंपदा विभाग शाखा अभियंता विक्रम गायकवाड,उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेत्या सुजाता जाधव,वनिता जाधव व सुजित जाधव याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वसंतनगर येथील अंगणवाडीस फॅन भेट देण्यात आला व गरजू कुटूंबाना किराणा माल साहित्य देण्यात आले.
संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या अमृता दास,अनिता जाधव,कोमल राऊत यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी बारामतीच्या माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकार,युवकांचे अध्यक्ष अमर धुमाळ,विजय जाधव,चंद्रकांत जाधव,प्रदीप जाधव,दिलीप गायकवाड,ओंकार जाधव,सयाजी गायकवाड,राहुल गायकवाड,निलेश गायकवाड,इजाज खान,सॅम गायकवाड,सुधाकर जाधव,संदिप जाधव,माणिक जाधव,धनंजय गायकवाड,श्रीकांत जाधव तसेच युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्री अष्टविनायक मंडळाचे कार्य कौतुकास्पद व चांगले काम करणारांना प्रेरणा देणारे असल्याचे पौर्णिमा तावरे,इम्तियाज शिकीलकार,अमर धुमाळ यांनी सांगितले
प्रास्ताविक ओंकार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार गौरव जाधव यांनी मानले.
No comments:
Post a Comment