धक्कादायक..सर्वपित्री अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 26, 2022

धक्कादायक..सर्वपित्री अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक...

धक्कादायक..सर्वपित्री अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन
 भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक...
ठाणे:- कोण कुठल्या थराला जाईल तर कोण भूत, करणी बाधा यासाठी काय करेल सांगू शकत नाही नुकताच सर्वपित्री अमावास्येच्या रात्री
भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी
पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील भोंदू मांत्रिकाच्या घरात घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध, समुळ उच्चाटन, अधिनियम 2013 चे कलम 3(2), 3 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन भोंदू मांत्रिकासह त्याचे
पाच साथीदार आणि दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. काजी दाउद शेख आणि बंधू तुकाराम वाघ असे अटक भोंदू मांत्रिकाचे नाव आहे, दोन भोंदू मांत्रिकासह तरुणींना रंगेहाथ पकडताना गावकरी यांनी दार उघडले आणि दृष्य पाहून गावकरीही चक्रावले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरबाड
तालुक्यातील सोनगावातील रशीद फकीर शेख यांच्या बंद घरात सर्वपित्री अमावास्येच्या रात्री नऊ ते साडे नऊ वाजल्याच्या सुमारास भूत आणि करणीची बाधा झालेल्यावर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य सुरू असल्याची माहिती शेजाऱ्याने गावातील पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडताच घरामधील अघोरी दृश्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला होता.घरातील एका खोली दोन तरुणी व भोंदू मांत्रिक आणि त्याचे साथीदार अघोरी पूजेचे साहित्य लिंबू, मिरची,
गुलाल, अभीर अगरबत्ती, नारळ इत्यादी असे साहित्य ठेवून त्या तरुणीवर अघोरी कृत्य करताना घरात दिसून आले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने भोंदू मांत्रिक,त्याचे साथीदार आणि तरुणींना पंचनामा करून घरातील अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले.नाशिकहून येणार होता मांत्रिक तर संजय लक्ष्मण भोईर, (वय 40 ) यांच्या तक्रारीवरून टोकावडे पोलीस ठाण्यात भोंदू मांत्रिकासह त्यांच्या साथीदारावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काजी दाउद शेख, बंधू तुकाराम वाघ, विजय बंधू वाघ भोंदू मांत्रिकासह साईनाथ गोपाळ कदम (वय 36 ), गणेश पोपटराव देशमुख (वय 36 ), दत्तात्रेय
बाळकृष्ण चौधरी (वय 36), गणेश रामचंद्र शेलार (वय 32 ) यांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. विशेष म्हणजे, नाशिकवरून आणखी एक मांत्रिक अघोरी पूजेसाठी येणार असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. आता पोलीस त्याही भोंदू मांत्रिकाच्या शोधात असल्याचे पोलीस सूत्रांकडून
सांगण्यात आले.आरोपी मांत्रिकांविरुद्ध यापूर्वीही नरबळीचा गुन्हा-धक्कादायक बाब म्हणजे, काल रात्री अटक केलेल्या भोंदू मांत्रिक काजी दाउद शेख आणि बंधू तुकाराम वाघ, यांच्यावर यापूर्वी 2009 मध्ये नरबळीचा गुन्हा दाखल असून त्यावेळी त्यांना पोलिसांनी अटक केली
होती. काल रात्री पुन्हा याच दोन्ही भोंदू मांत्रिकांनी दोन तरुणीवरील भूतबाधा व करणीच्या नावाने अमानुष आणि अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रकारची कृत्य साथीदारांशी संगनमत करून केले होते.त्यांच्यावरही विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक संतोष दराडे,यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक संतोष दराडे करित आहेत.

No comments:

Post a Comment