बारामतीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्या बाबत भाजपच्या वतीने बानपकडे तक्रार.. बारामती:- मुख्याधिकारी बारामती नगर परिषद बारामती यांना नुकतेच निवेदन देण्यात आले या निवेदनात भटक्या कुत्र्यांच्या समस्या बाबत तक्रार करण्यात आली आमच्या कल्याणीनगर, तांदुळवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. सदरील ठिकाणी एका दिवसात ७ ते ८ व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. त्यामुळे सदरील परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांना रस्त्यावर येणे जाणे अशक्य झाले आहे.तरी आपण दिलेल्या अर्जाची दखल घेतली नाही तर आपल्या कार्यालया बाहेर अंदोलन करण्यात येईल असे म्हंटले आहे हे निवेदन मुख्याधिकारी यांनी स्वीकारले असून लवकरच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू असे आश्वासन दिले यावेळी कु. लक्ष्मी मारूती मोरे(महिला समन्वयक भारतीय जनता पार्टी बारामती शहर)(अध्यक्ष संयोगीता सामाजिक संस्था, बारामती शहर),श्री संतोष जाधव सचिव बारामती शहर भाजपा, महेश नेटके युवा कार्यकर्ता भाजपा उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, September 19, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्या बाबत भाजपच्या वतीने बानपकडे तक्रार..
बारामतीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्या बाबत भाजपच्या वतीने बानपकडे तक्रार..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment