धुमधडाक्यात,गणपतींचे विसर्जन.. गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 9, 2022

धुमधडाक्यात,गणपतींचे विसर्जन.. गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात?

धुमधडाक्यात,गणपतींचे विसर्जन.. गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात?
बारामती :- गेली दहा दिवस गणपती थाटामाटात, आरास व लाईटच्या लखलखात दिमाखात बसला होता भक्तगण त्याची मनोभावे सेवा करीत होता आज त्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले,घरगुती गणपतीसह मंडळाच्या
गणपतीमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. अखेर लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली त्यानुसार अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करण्यात येते. गणपती विसर्जन
पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक कारणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो.धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे. महर्षी वेदव्यास यांनी सलग 10 दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा 10 दिवस तंतोतंत लिहिली. 10
दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा, त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशःचटका लागला. त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. तेव्हापासून असे मानले जाते की,गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते अशी माहिती कळतेय.

No comments:

Post a Comment