तहसील कार्यालयातला अव्वल कारकून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात..
फलटण:- लाच घेणाऱ्याचे प्रमाणात वाढ होत असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी जास्त प्रमाणात लाच घेताना सापडतात तर काही त्यांच्या एजंट मार्फत घेत असतात, नुकताच फलटण तहसीलचा लाचखोर, अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात सापडला असल्याचे माहिती मिळाली फलटण. दि.20/9/2022 तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असणारा पांडुरंग नामदेव जाधव (पी. एन. जाधव) वय 53 वर्ष आणि त्याचा खाजगी साथीदार अरुण सदाशिव सपकाळ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक
खात्याने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात
पकडले.याबाबत सविस्तर तक्रारदार याचा रस्ता नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करून देण्यासाठी अव्वल कारकून व त्याचे खाजगी सहकारी यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित कारकूनास व खाजगी इसम साथीदारास सापळा रचून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळा पथकात पोलीस निरीक्षक सचिन राऊत विक्रम पवार पोलीस निरीक्षक पोलीस नाईक राजे संभाजी काटकर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा युनिट सदर प्रकरणामध्ये पर्यवेक्षण अधिकारी म्हणून सुजय गाडगे पोलीस उपनिरीक्षक सांगली अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा व मार्गदर्शन अधिकारी म्हणून राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment