बापरे..बारामतीत काम करणारे पोलीस अधिकारी व पोलीस का होतात विविध कारनामे करून बदनाम?तपासात कर्तव्यात कसूर की आर्थिक तडजोड? बारामतीच्या तत्कालिन 'डिवाएसपी'सह तीन पोलिस अधिकारी व पोपट तावरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 27, 2022

बापरे..बारामतीत काम करणारे पोलीस अधिकारी व पोलीस का होतात विविध कारनामे करून बदनाम?तपासात कर्तव्यात कसूर की आर्थिक तडजोड? बारामतीच्या तत्कालिन 'डिवाएसपी'सह तीन पोलिस अधिकारी व पोपट तावरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बापरे..बारामतीत काम करणारे पोलीस अधिकारी व पोलीस का होतात विविध कारनामे करून बदनाम?तपासात कर्तव्यात कसूर की आर्थिक तडजोड? बारामतीच्या तत्कालिन 'डिवाएसपी'सह तीन पोलिस अधिकारी व पोपट तावरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.                                                                                         बारामती/दौंड:- बारामती महाराष्ट्रात गाजतेय,माजी उपमुख्यमंत्री अजितदादांनी बारामतीत मोठे व प्रशस्त असे पोलीस स्टेशन साठी व पोलीस मुख्यालयासाठी कोटयावधी रुपये निधी आणला पण त्याच बारामती त कोणी नवीन पोलीस अधिकारी अथवा पोलीस आला की त्याच्यावर कोणताना कोणता आरोप होतो हे मागील काही घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे त्यामुळे काही लोकांमुळे पोलीस बदनाम होत आहे,लवकरच एका पोलीस निरीक्षक व दोन सहा.पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील एका महिलेने कोर्टात तक्रार केली असून त्यांना याबाबत समन्स बजावले आहे याबाबत लवकरच बातमी येईल पण आज धक्कादायक माहिती मिळाली ती म्हणजे यवत पोलिस ठाण्याच्या एका गुन्ह्यात तपास व्यवस्थित झाला नाही, कर्तव्यात पोलिसांनी कसूर केली, या कारणावरून तक्रारदाराने न्यायालयात न्याय मागितला आणि दौंडच्या प्रथमवर्ग न्यायालयाने चक्क तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्मराज गंपले, कैलास(पोपट) तावरे या चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आरती शरद लव्हटे (घरकुल सोसायटी,पाथरेवस्ती, लोहगाव पुणे) व किरण शांताराम भोसले (जोगवडी, पोस्ट मावडी, ता. बारामती, जि.पुणे) यांनी न्यायालयात धाव घेतली होती.जमीनीच्या एका प्रकरणात पोपट उर्फ कैलास तावरे याच्याविरोधात यवत पोलिस ठाण्यात आरती लव्हटे व किरण भोसले यांनी सन २०२१ मध्ये तक्रार दिली होती. यामध्ये यवत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता.
खरेदीखतातील फसवणूकीवरून तावरे याच्यासह
केरबा लव्हटे, रामदास लव्हटे, लक्ष्मण लव्हटे व
जनाबाई लव्हटे याच्याविरोधात आरती लव्हटे व किरण भोसले यांनी यवत पोलिसांकडे फिर्यादी
दिल्या होत्या. कारण बारामती तालुक्यातील क्षेत्र
असले तरी त्याची खरेदी मात्र दौंड तालुक्यातीलच दुय्यम निबंधक कार्यालयात होते.दरम्यान या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाही
दाखल केला. इतरांवर कारवाई करताना, मात्र या
गुन्ह्यात पोपट तावरे याला वाचविण्याचा प्रयत्न
पोलिसांनी केला अशी तक्रारदारांची तक्रार होती.
दुसरीकडे तक्रारदाराचे साक्षीदार न घेता
आरोपीलाच वाचविण्याचा प्रयत्न करीत त्याला
अनुकूल साक्षीदारांचे जबाब घेऊन खोटी फिर्याद
असल्याचे पोलिसांनी सिध्द करण्याचा प्रयत्न
केला व आरोपीने तोपर्यंत अटकपूर्व जामीन
घेतला, त्यामध्ये पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली.
म्हणून आरती लव्हटे व किरण भोसले यांनी
न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल
केला. याची सुनावणी दौंडच्या प्रथम वर्ग
न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. एस. खेडेकर- गोयल यांच्या समोर चालली. यामध्ये त्यांनी २१ सप्टेंबर रोजी हा आदेश दिला आहे. वरील चौघांवर गुन्हा दाखल करून याचा तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश यवत पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास दिला आहे. या प्रकरणात आरती लव्हटे व किरण भोसले यांच्या वतीने अॅड.राजेश कातोरे, अॅड. अमित काटे व त्यांचे
सहायक अॅड. संदीप येडे यांनी युक्तीवाद केला,अशी माहिती कळतेय.सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले
नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे प्रकरण यवत पोलीस स्टेशनचे आहे. त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.यवत पोलीस स्टेशन माझ्या (बारामती उप विभाग, पुणे
ग्रामीण) अंतर्गत कधीच नव्हते तसेच यवत पोलीस स्टेशन ज्या विभागात आहे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे कधीच नव्हता.त्या प्रकरणाच्या तपासाचा माझा काहीही संबंध नाही.त्यामुळे या संदर्भात मी न्यायालयात अपील केले आहे.

No comments:

Post a Comment