RTO चे दुर्लक्ष,कार्ड चालू असल्याचा संशय?कारवाई करण्यास टाळाटाळ.! बारामती:-गेल्या अनेक वर्षांपासून जड वाहनावर कारवाई व्हावी म्हणून सतत पाठपुरावा होत असताना देखील जाणून बुजून ही कारवाई करण्यास टाळाटाळ का होतेय हे समजले नाही परंतु अनेकांनी बोलताना सांगितले की जड वाहन चालकाकडून rto अधिकारी व कर्मचारी यांना कार्ड देत होतो म्हणून कारवाई होत नव्हती अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे संशय बळावत चालल्याचे दिसत आहे, कारण आज सुद्दा जड वाहतूक करणारी वाहने राजरोस पणे रस्त्यावरून जाताना दिसतात उदा. खडी, रेती, मुरूम, वाळू,रेेेशनिंग, जड सामान प्रमाणापेक्षा ओव्हर लोड वाहतूक करीत आहे अनेक वेळा अश्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात झाले आहे,हे विसरून चालणार नाही, असे जड वाहने शक्यतो पाटस रोड, गुणवडी रोड, भिगवण रोड, सोनगाव ते पिंपळी रोड,सोमेश्वर ते माळेगाव रोड, माळेगाव ते बारामती,पळशी, उंडवडी,पणदरे, वडगाव नि. मोरगाव रोड ते खंडोबा नगर चौक,पाटस रोड चौक(रिंग रोड),सातव चौक ते तांदुळवाडी रोड,रेल्वे स्टेशन ते एमआयडीसी रोड,मेखळी ते गुणवडी चौक,निरा वागज ते गुणवडी चौक अश्या अनेक ठिकाणी रस्त्यावर व चौकात जड व प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक करणारी वाहने पहावयास मिळतील पण हे मात्र Rto अधिकारी किंवा कर्मचारी यांना दिसत नसावे की अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी केली आहे काही वाहनांवर तर गाडी नंबर खुडलेले आहे तर काही वाहनावर नंबर च टाकले नाही हे दिसत नाही का?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे,अश्या वाहनांवर कारवाई कधी होईल हे येणारा काळच ठरवेल.***
Post Top Ad
Sunday, September 11, 2022
RTO चे दुर्लक्ष,कार्ड चालू असल्याचा संशय?कारवाई करण्यास टाळाटाळ.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment