धक्कादायक...प्रेमसंबंध करून महिला पोलीसावर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तब्बल 13 लाख.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

धक्कादायक...प्रेमसंबंध करून महिला पोलीसावर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तब्बल 13 लाख..

धक्कादायक...प्रेमसंबंध करून महिला पोलीसावर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तब्बल 13 लाख..
बीड :-दिवसेंदिवस महिला अत्याचाऱ्याच्या बातम्या पाहतो,वाचतो त्यावेळी आपसूक आपल्या मनामध्ये चीड निर्माण होते हे कधी थांबणार, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदवस वाढ होत आहे. यातच आता एका महिला पोलीस अंमलदारावर अत्याचार करुन तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आरोपीने महिला अंमलदार यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार केले.याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिला अंमलदार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनायक अनिल सवाई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विनायक याने महिला अंमलदार यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करुन ब्लॅकमेल करत तब्बल 13 लाख रुपये उकळले. ही धक्कादायक घटना 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे.पीडित महिलेने 2020 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर भाड्याने घेतले आहे.याठिकाणी ती आपली आई आणि भावासोबत राहते. याच ठिकाणी तिची ओळख आरोपी विनायक याच्यासोबत झाली.
ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.या दरम्यान विनायक याने पैशाची गरज असल्याचे सांगितले. पीडित महिलेने एका पतसंस्थेतून दोन लाख रुपये कर्ज काढून त्याला दिले. दिलेल्या पैशांची मागणी महिलेने केली असता आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment