काय सांगता..महिला तलाठी 7/12 उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी 15 हजार रुपये लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 10, 2022

काय सांगता..महिला तलाठी 7/12 उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी 15 हजार रुपये लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात..

काय सांगता..महिला तलाठी 7/12 उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी 15 हजार रुपये लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात..                                                                         सांगली : - बहुतांश ठिकाणी तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयात महत्वाच्या ठिकाणी महिला अधिकारी महत्वाचे विभागाचे अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले पाहिले आहे,यातील काही महिला पदाधिकारी या कामात कुचराई करताना दिसतात यावेळी केवळ महिला असल्याने तक्रार करण्यास पुढे कोणी येत नाही याचाच फायदा घेत सर्वसामान्य लोकांचे कामे मार्गी लावत असताना लाच द्यावी लागत असल्याचे कळत आहे, तर नुकताच शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील आणेवारी दुरुस्त करण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी येथील महिला
तलाठी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मनिषा मोहनराव कुलकर्णी (वय-37 रा. इस्लामपूर, ता.वाळवा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. सांगली एसीबीच्या पथकाने  ही कारवाई सोमवारी (दि.10) खेराडेवांगी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून केली.याबाबत एका शेतकऱ्याने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  केली. तक्रारदार यांच्या वडिलांची जमीन शासनाने पुनर्वसनासाठी संपादित केली होती.
भूसंपादन करताना जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीची आणेवारी नोंद झाली होती. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी खेराडेवांगी तलाठी मनिषा कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता. कुलकर्णी यांनी उताऱ्यावरील आणेवारीची दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाच मागितली.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.सांगली एसीबीच्या युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठी मनिषा कुलकर्णी यांनी 7/12 उताऱ्यावरील आणेवारीची दुरुस्ती करण्यासाठी 15
हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने
सोमवारी खेराडेवांगी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून मनिषा कुलकर्णी यांना तक्रारदार
यांच्याकडून 15 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ
पकडले. कुलकर्णी यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे
परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय
घाटगे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी , हवालदार अविनाश सागर,सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, स्वप्नील भोसले यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment