विद्या प्रतिष्ठान चा ओम सावळेपाटील 'बर्गमॅन ' किताब ने सन्मानित..
बारामती :- पुणे येथील डेक्कन स्पोर्ट्स क्लब च्या वतीने 'बर्गमॅन' पुणे कंट्री साईड या स्पर्धेचे रविवार 09 ऑक्टोम्बर रोजी डिंभे धरण येथे आयोजन करण्यात आले होते या मध्ये विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय चा ओम सावळेपाटील यास ट्रॅयथॉन क्रीडा प्रकारात बर्गमॅन हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
18 ते 24 वर्ष वयोगटात पोहणे 1.5 किमी,सायकलिंग 40 किमी व पळणे 10 किमी हे तिन्ही क्रीडा प्रकार लागोपाठ पूर्ण करीत .सैन्यदल व रेल्वेच्या स्पर्धकांबरोबर स्पर्धा करीत 2 तास 27 मिनिटात हि स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल सदर किताब देण्यात आला.
डेक्कन स्पोर्ट्स क्लब चे संचालक उदय पाटील व पिंपरी चिंचवड स्पोर्ट अकॅडमि चे महेश लुणावत, दादासाहेब काटे,दिनेश लांडे आदी मान्यवर उपस्तित होते.
अनुभवी रेल्वे व सैन्यदल मधील स्पर्धकांशी स्पर्धा करीत पहिल्या प्रयत्नात कमी वयात व कमी वेळेत हि स्पर्धा पूर्ण करणे कौतुकास्पद असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले.
विद्या प्रतिष्ठान च्या विश्वस्त सुनेत्रा पवार, सचिव नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार व
विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर के बिचकर, विभाग प्रमुख चित्तरंजन नाईक,प्रशिक्षक संतोष जानकर आदी नि ओम सावळेपाटील याच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment