*रुग्णाच्या मृत्यूनंतरही दीड लाख रुपये भरण्यासाठी होणारा तकादा, रुग्ण हक्क परिषदेच्या मध्यस्थी नंतर कायमचा थांबला!*
पुणे दि. 11ऑक्टोबर: - केंद्र सरकारच्या सेवेत असलेले कर्मचारी सुभाष गजरमल यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने, त्यांचे दोन्ही वोल्व्ह डॉक्टरांनी बदलण्यास सांगितले होते. श्री गजरमल हे केंद्र सरकारमध्ये कर्मचारी असल्याने त्यांचे सर्व उपचार सीजीएस मध्ये होणे अपेक्षित होते, मात्र पुणे स्टेशन जवळील एका मोठ्या धर्मादाय हॉस्पिटलने त्यांना स्वतः जवळील सात लाख रुपये भरण्यास सांगितले. श्री. गजरमल यांनीही क्रेडिट कार्डद्वारे सुमारे सात लाख रुपये भरले. 16 जून 2022 रोजी त्यांचे ऑपरेशन झाले, मात्र दुर्दैवाने 17 जून 2022 रोजी त्यांचा ऑपरेशन झाल्यानंतर लगेच मृत्यू झाला. निधन झाले.
त्यांच्या मृत्यूला आज चार महिने उलटून गेले असले, तरी दररोज हॉस्पिटल मधून त्यांना दीड लाख रुपये भरा, अशा पद्धतीचे फोन येत होते. श्री. गजरमल यांच्या पाश्चात त्यांच्या पत्नीला अद्याप पेन्शन सुरू झाली नाही. हॉस्पिटल साठी काढलेले सात लाख रुपये क्रेडिट कार्डचे दर महिन्याला हप्ते सुरू असताना हॉस्पिटल साठी दीड लाख कुठून भरायचे? यामुळे व्यथित आणि हतबल झालेल्या गजर्मल कुटुंबियांनी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भेट घेतली.
उमेश चव्हाण यांनीही हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांचे उर्वरित दीड लाख रुपये बिल माफ करून, बिलाचे ऑडिट करून पुन्हा हॉस्पिटललाच त्यांना 62 हजार रुपये परतावा द्यायला भाग पडले. त्यांना केंद्र सरकारकडूनही भरलेल्या सात लाख रुपयांचा परतावा मिळण्यासाठी हॉस्पिटलमध्येच थांबून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. मयत श्री. गजरमल यांच्या पाश्चात केंद्र सरकारकडून मिळनाऱ्या बिलांमुळे त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्यासह, संबंधित हॉस्पिटलचे अधिकारी श्री. सोनवणे, पोलीस निरीक्षक श्री. वैराळ साहेब, पोलीस कर्मचारी श्री. आशिष कांबळे, अजय भालशंकर, श्री. गजरमल यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
*अधिक माहितीसाठी -*
रुग्ण हक्क परिषद, केंद्रीय प्रधान कार्यालय, 136, नारायण पेठ, पुणे - 30
संपर्क - 8806066061 /8956185702/05
No comments:
Post a Comment