ज्योती -सावित्री इंटरनॅशनल स्कुल च्या खाजगी करणास -RPI चा विरोध.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 13, 2022

ज्योती -सावित्री इंटरनॅशनल स्कुल च्या खाजगी करणास -RPI चा विरोध..

ज्योती -सावित्री इंटरनॅशनल स्कुल च्या खाजगी करणास -RPI चा विरोध
सासवड :-खानवडी येथे नव्याने स्वयं अर्थ सहाय्यत ज्योती -सावित्री इंटर नॅशनल स्कुल उभारण्याचे पुणे जिल्हा परिषदेने जाहीर केले. त्यानुसार राज्य सरकारने चार हेक्टर जमीन देखील दिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या  वतीने अशा पद्धतीची निवासी शाळा उभारण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
  सदरची शाळा खाजगी शिक्षण संस्थेला चालविण्यास देण्याचा जिल्हा परिषदेने प्रस्ताव राज्य सरकार च्या ग्रामीण विभागा कडे पाठविलेला आहे. महात्मा फुले यांनी आयुष्यभर भांडवलशाहिला विरोध केलेला आहे. त्याच महात्मा फुले यांच्या नावाने सुरु करण्यात येणाऱ्या या शाळेची सुरुवातच भांडवलदरांच्या ताब्यात देऊन होणार असेल तर त्या महात्माच्या विचारांना तिलांजली देण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा विचार आहे असे मत पुरंदर तालूका रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. यावेळी ते असेही म्हणाले की सदरची शाळा खाजगी शिक्षण संस्थेला चालविण्यास देण्यासआमचा तीव्र विरोध आहे. ज्या उद्दिष्टाने सदरची शाळा सुरु करण्याचा हेतू आहे की बहुजन समाजातील गोर गरिबांच्या मुलींना शिक्षण घेता यावे तो मुख्य उद्देश बाजूला पडलेला दिसत आहे. पुरंदर तालूक्यातील गरिबांच्या मुलींना या स्कुल चा खऱ्या अर्थाने लाभ द्यायचा असेल तर खाजगी शिक्षण संस्थेला चालविण्यास देणे योग्य नाही.क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीमाई यांनी प्रसंगी दगड गोटे शेण झेललं पण इथल्या बहुजन मुलीना शिक्षणाची कवाडे खुली केली.पुरंदर तालुक्यातील मुलींना शिक्षण घ्यावयाचे असेल तर महाविद्या लयीन शिक्षणासाठी सासवड हेच एकमेव केंद्र आहे. तालुक्याचे शेवटचे टोक हे 45की. मी अंतरावर आहे तिथं पासून या मुलींना यावे लागते. सर्व शिक्षा अभियान चा डंका सर्वत्र शासन मिरवत आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे खाजगीकरण करायचे ही गोष्ट निंदनीय आहे.जर जिल्हा परिषद प्रशासनाने ऐकले नाही तर आम्ही रिपब्लिकन पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करू. त्याच बरोबर ज्योती सावित्री नावा ऐवजी सावित्री ज्योतीराव फुले इंटर नॅशनल स्कुल असे नाम करण  करावे  ही मागणी आमची आहे.

No comments:

Post a Comment