औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हेंबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 14, 2022

औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हेंबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा..

औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हेंबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा..
औरंगाबाद October 14, 2022:-
औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हेंबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन ५ व ६ नोव्हेंबर २०२२ रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबादच्या  येथे करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी दिली आहे.

सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाडू महाराष्ट्राला ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी  तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद, २०२२ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. 

तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आप आपापल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर  खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करावी असे त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना आवाहन या माध्यमातून केले आहे.

ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन (CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन (SAKF), वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी (IOC) यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) मान्यतेने संपन्न होणार आहे.

तरी या राज्य सब ज्युनिअर कराटे स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.karatemaharashtra.in याठिकाणी संकेतस्थळावर वा आमचे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( KAM ) चे जिल्हा प्रतिनिधी वा राज्य महासचिव संदीप गाडे ९८९२१५२१९७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment