माळेगाव मधील केव्हीके रोडला महिलेच्या गळ्यातील गंठन चोरट्यांनी सतूर दाखवत केले लंपास... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 15, 2022

माळेगाव मधील केव्हीके रोडला महिलेच्या गळ्यातील गंठन चोरट्यांनी सतूर दाखवत केले लंपास...

माळेगाव मधील केव्हीके  रोडला  महिलेच्या गळ्यातील गंठन चोरट्यांनी सतूर दाखवत केले लंपास...                                                 माळेगाव:- दि. 13/10/2022 रोजी मनिषा प्रमोद तावरे वय 41 वर्षे  रा. शारदानगर ता. बारामती, जि. पुणे यांनी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहून फिर्याद दिली ती अशी की, मी वरील ठिकाणी माझे
पती प्रमोद धोंडिबा तावरे, सासरे धोंडीबा व मुलगा अथर्व असे एकत्रीत राहणेस असुन माझे पती माळेगाव येथील प्रतीभा पतसंस्था येथे कलेक्शनचे काम करतात त्यावर आम्ही आमचे कुटूंबाची उपजिवीका करतो.दिनांक 13/10/2022 रोजी सकाळी 6:00 वा. चे. सुमारास शारदानगर येथून केव्हीके रोडने नेहमी
प्रमाणे मेडद बाजुकडे जाणा-या रोडला एकटीच पायी चालत चालली होती. मी रोडने सुरेश काळे यांचे बंगल्याचे मागे दोनशे मीटर अंतरावर असताना 06:20 वा. चे. सुमारास माझे पाठीमागून एक लाल रंगाचे मोटार सायकल
त्यावर ट्रीपलशिट बसलेले इसम मला क्रॉस करून पुढे गेले. पुढे जावून मी एकटीच असल्याचे पाहून परत वळून माझे दिशेने आले व मोटार सायकल माझे जवळ थांबवून त्यातील पाठीमागे बसलेला इसमाजवळ हातात सतुर
दिसला. तो मोटार सायकलवरून खाली उतरुन माझेकडे हातात सतुर घेवून आल्याचे मी पाहिले तो अंगाने सडपातळ व उंच होता. केस कुरुळे होते. तोंड आर्धवट बांधलेले होते. अंगात काळे जकींग होते. त्यावेळी मी मागे सरुन माघारी ओरडत पळू लागले तेव्हा त्याने मला खाली ढकलून दिले त्यावेळी मी माझ्या गळ्यातील गंठन
तोडून बाजुला फेकला. त्यावेळी त्यास माझे हाताचे पुढे तोडून टाकलेला गंठन दिसला. तो त्याने घेवून मोटार सायकलवर बसून मोटार सायकल शारदानगर बाजुकडे वळवली त्यावेळी मी सदर मोटार सायकलचा चालक पाहिला असता तो अंगाने जाड असून रंगाने गोरा आहे त्याने त्याचे अर्थे तोंड बांधलेले होते. अंगात काळे जकींग व टी-शर्ट होता. व मध्ये बसलेल्या इसमाचे वर्णन सांगता येत नाही. सदर इसमांना मी पाहिल्यास ओळखेन त्यांनी माझे गळ्यातील मी तोड्न फेकून दिलेला गंठन चोरुन घेवुन गेले त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.1·) 80,000/- रु. किंमतीचे एक सोन्याचे गंठन 17 ग्रॅम वजनाचे त्यास दोन्ही बाजूने साखळ्या असलेले व मध्ये
काळे मणी असलेले त्यास सोन्याचे बदामी आकाराचे पेंडेन्ट त्यास सोन्याचे पान असलेले जु.वा.कि.अं.80,000/- रुपये असा असलेला वरील वर्णनाचा व किंमतीचा गंठन बळजबरीने नेला आहे. म्हणुन माझी सदर तीन अज्ञात मोटार सायकलवरुन आलेल्या इसमांविरुद्ध फिर्याद आहे.तरी दिनांक 13/10/2022 रोजी सकाळी 06:20 वा. चे. सुमारास मौजे माळेगाव गावचे हद्दीत केव्हीके रोडला ता. बारामती, जि. पुणे रोडला सुरेश काळे यांचे बंगल्यांचे मागे दोनशे मिटर अंतरावर एक लाल रंगाचे मोटार सायकलवरुन तीन इसम येवून त्यातील पाठीमागील इसम मोटार सायकलवरून खाली उतरुन हातात सतुर घेवून माझेकडे येत असताना मी मागारी पळाले असता मला ढकलून देवून खाली पाइन गळ्यातून तोड्न फेकून दिलेला गंठन बळजबरीने चोरुन घेवून गेले. म्हणुन माझी त्या तीन अज्ञात मोटार सायकलवरून
आलेल्या इसमांविरुद्ध फिर्याद आहे अशी
पोलीस ठाणे अंमलदासदार माळेगाव पोलीस स्टेशनने जबाब लिहून घेतला अधिक तपास पो ह जगताप हे करीत आहे.

No comments:

Post a Comment