खळबळजनक...विवाहितेवर बलात्कार करीत फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी,एकाविरोधात गुन्हा दाखल.. बारामती :- बारामती तालुक्यातील अनेक गावात महिला व मुलींवर अत्याचार होत आहे, कुणी तक्रार करतात तर कुणी इज्जतीपोटी गप्प बसतात, पण याला वाचा फुटली पाहिजे असे म्हणून काही महिला पुढे येतात अशीच एक घटना नुकताच बारामती तालुक्यात घडली याबाबत माहिती अशी की,विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तुषार लालासो भापकर (रा. कारखेल, ता.बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारखेलमधीलच पिडीतेने याबाबत फिर्याद दिली. दि. ९ डिसेंबर २०२१ ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. ९ डिसेंबर रोजी ही महिला कारखेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड प्रतिबंधक लस घेवून पायी घरी निघाली होती.यावेळी भापकर हा मोटारसायकलने तेथे आला.त्याने 'वहिनी मी तुम्हाला घरी सोडतो' असे म्हणत तिला दुचाकीवर बसवले. स्वतःचे घरी नेत तुम्ही मला खूप आवडता, असे म्हणत घरात तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. 'तू ओरडलीस तर खल्लास करीन' अशी धमकी
दिली. त्याने यावेळी दोघांचे फोटो काढले. हे फोटो सगळीकडे व्हायरल करेन अशी धमकी देण्यास त्याने सुरुवात केली. तुझ्या नवऱ्याला व मुलांना खल्लास करून टाकीन असे म्हणत तिला मोरगाव,खामगळवाडी आदी ठिकाणी लॉजवर नेत तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.तर या घटनेवरून दिसून येत आहे की बारामती तालुक्यातील व शहरातील अनेक लॉजवर अश्या घटना घडल्या हे मागील काही बलात्काराच्या नोंदविलेल्या तक्रारीत नमूद आहे,मग असे लॉज वर काय कारवाई होते का?त्यांना याबाबत खबरदारी घेण्याचे काही सूचना केल्या का?हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला असून अश्या लॉजवर कारवाई कधी होईल अशी विचारणा होत आहे.
No comments:
Post a Comment