*परतिच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी- रासप*
बारामती:- बारामती आणी परिसरात परतीचा पाऊस खुप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, त्या मुळे तालुका आणी परिसरातील शेतकऱ्याची शेतातील उभी पिके भुईसपाट झालेली आहेत, नदी ओढे नाले तुडुंब भरून वाहिल्या मुळे काही जनाची उभी पिके देखील त्या पाण्यात वाहुन गेलेली आहेत, शेतकर्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या पावसा मुळे माती मोल झालेला आहे,ऐन दिवाळीत शेतकर्यावर या परतीच्या पावसा मुळे संकट कोसळले आहे, तरी लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्याला दिवाळीच्या तोंडावर तातडीची नुकसानभरपाई शाषणाने द्यावी या मागणी संदर्भात राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने मा.तहसीलदार साहेब मा. विजय पाटील यांना निवेदण देण्यात आले, या वेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.संदिप चोपडे, तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, विठ्ठल देवकाते,महादेव कोकरे,श्याम घाडगे, रेवन कोकरे,निखील दांगडे किशोर सातकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
No comments:
Post a Comment