विनयभंग व बाललैगिक अत्याचाऱ्याच्या गुन्हातून निर्दोष मुक्तता* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 2, 2022

विनयभंग व बाललैगिक अत्याचाऱ्याच्या गुन्हातून निर्दोष मुक्तता*

*विनयभंग व बाललैगिक अत्याचाऱ्याच्या गुन्हातून  निर्दोष मुक्तता*
बारामती:- बारामती येथील मे अति.जिल्हा. व  सत्र न्यायाधीश सो JP दरेकर साहेब यांनी आरोपी नामे सूरज  जगताप याची अल्पवयीन मुलीचा  विनयभंग छेडछाड व लैंगिक अत्याचार केलेचे  आरोपातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 
सविस्तर माहिती अशी की पीडित मुलगी व तिची अत्या या रात्री बारामती रेल्वेस्थानक समोरील ग्राउंड वरुन जात असताना आरोपी याने पीडित मुलीस शुक .....शुक करून, थुंकून उजव्या हाताला धरून हाताने मारहाण केली व अत्या सोडविण्यासाठी आली असता तीस मारहाण केली. या आरोपाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कायदा कलम 354,323,504,506 बाललैंगिक  अत्याचार कायदा कलम  8 , 12 अन्वये बारामती शहर स्टेशनमध्ये  दिनांक 04/07/2014 रोजी गुन् र नं -300/2014 अन्वये दाखल झाला. सदर गुन्ह्याचा  तपास होऊन दोषा  आरोपपत्र मा. न्यायालया त सेशन कोर्ट बारामती येथे दाखल झाले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड .विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले.  युक्तिवादात अ‍ॅड.जावळे यांनी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद केला की गुन्हा दाखल करण्यास दोन दिवसाचा उशीर झालेला आहे. घटनेस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत साक्षीदारांच्या जबाबात तफावत जाणवते, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे कागदोपत्री निष्पन्न होत नाही. पोलिसांनी तपासामध्ये  त्रुटी ठेवलेल्या आहेत, वैद्यकीय पुरावा निष्पन्न होत नाही. अशा विविध मुद्दे मे कोर्टापुढे आरोपीच्या वतीने मांडण्यात आले.  सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरत  आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली, आरोपीच्या वतीने अ‍ॅड.विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले

No comments:

Post a Comment