दिवाळी मधील वृक्षारोपण काळाची गरज : उद्धव मिश्रा..
बारामती :- दिवाळी सण दिव्यांचा व मांगल्याचा आहे आशा गोड सणा निमीत्त औद्योगिक क्षेत्रात दिवाळी मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण वाढ व रक्षण चे काम करून आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पुढाकार घेत असून दिवाळी सारख्या सणानिमित्त सुद्धा वृक्षारोपण हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्धव मिश्रा यांनी सांगितले. बारामती एमआयडीसी मधील जीटीएन इंजिनिअरिंग लि.मध्ये खास दिवाळी निमीत्त वृक्षरोपण व संवर्धन चा संदेश सर्व दूर जाणे करीता वृक्षारोपण चा कार्यक्रम गुरुवार 20 ऑक्टोम्बर रोजी आयोजित करण्यात आला होता.बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, व कंपनीचे जीटीएन चे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रकल्प प्रमुख उद्धव मिश्रा, उप व्यवस्थापक संतोष कणसे, लेखाधिकारी सिद्धार्थ गोळे आदींच्या हस्ते कंपनीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
बिमा च्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन साठी सर्व मदत करण्याचे आश्वासन धनंजय जामदार यांनी दिले. विदेशी झाडे न लावता ज्या झाडावर पक्षी बसून विश्रांती घेऊ शकतात, फळे व सुवासिक फुले येऊ येऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढू शकते अशीच देशी झाडाचे वृक्षारोपण करणार असल्याचे संतोष कणसे यांनी सांगितले तर आभार वल्लभ गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment