आत्ता वाळू माफियांची खैर नाही..वाळू चोरणारे असो वा अधिकारी, सोडणार नाही- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.
नागपूर :- महाराष्ट्रात वाळू माफिया वाढत असून त्याला पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू चोरणारे नेते असो वा अधिकारी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा दिला होता. आता वाळू चोरी करणारा जिल्ह्यातील नेता कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.अनेक जण यावर तर्कवितर्क लढवत आहे.कोळसा खाणी आणि व्यवसायावर आधारित मिनकॉन परिषद नागपुरात गेल्या आठवड्यात पार पडली. त्यावेळी फडणवीसांनी हा इशारा दिला होता. नागपूर जिल्ह्यात
मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहेत. यात मोठमोठे
व्यावसायिक, वाळू माफिया गुंतले आहेत. त्यांना काही राजकीय नेत्यांचा आर्शीवाद लाभला आहे. वाळू घाट जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे पहिले लक्ष सावनेर, कामठी, उमरेड, रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघाकडे जाते. याच मतदारसंघात सर्वाधिक नद्या आणि वाळू घाट आहेत.महाविकास आघाडीच्या कार्यकाळात वाळू घाटावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ठिणगी पडली होती. पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सावनेर मतदारसंघातील काही घाटांवर धाडी टाकल्या होत्या. मात्र नंतर लगेच हे प्रकरण शांत झाले होते. वाळू घाटावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये धुसफुस सुरू झाली होती. राज्यात शिंदे सेना-भाजपची सत्ता आल्यानंतर भाजप ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी वाळू चोरी, बनावट टीपीद्वारे होत असलेल्या उपस्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलिस आयुक्तांकडे केली होती.मध्य प्रदेशातील टीपीवर नागपूरमध्ये वाळूचा उपसा केला जात असल्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली होती.काही नेत्यांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता. अलीकडेच पोलिसांनी वाळू चोरट्यांवर मोठी कारवाई केली होती. ग्रामीण
भागातील काही नेत्यांच्या समर्थकांवर गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान कोणाला तरी इशारा देणारे आहे, असे दिसून येते. त्यांचा रोख काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांकडे असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.
No comments:
Post a Comment