कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस व हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत निकिता टकले खडसरेचे यश दोन्ही स्पर्धेत विजेतेपद पटकाविले - गोवा स्पर्धेसाठी निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 16, 2022

कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस व हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत निकिता टकले खडसरेचे यश दोन्ही स्पर्धेत विजेतेपद पटकाविले - गोवा स्पर्धेसाठी निवड

कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस व हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत निकिता टकले खडसरेचे यश दोन्ही स्पर्धेत विजेतेपद पटकाविले - गोवा स्पर्धेसाठी निवड 

हडपसर / पुणे (प्रतिनिधी ):-फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धेत प्रथम ट्रॉफी पटकविल्यानंतर लगेच हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत 14 फेऱ्यामध्ये 12 फेऱ्या जिंकल्या,  निकिता टकले खडसरे या स्पर्धक युवतीने गोवा येथे होणाऱ्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होण्याचा मान मिळविला आहे.पावसाळा कार रेस स्पर्धा मोसम सुरु झाला असताना प्रचंड पाऊस वा ट्रॅकवर चिखल झालेला असताना निकिता टकले खडसरे या युवा स्पर्धेकाने पदार्पणताच आपल्या यशाची चुणूक दाखविली, खडतर प्रवास असताना देखील कर्नाटक स्पर्धा जिंकून लगेच बायरोड हैद्राबाद कडे प्रयाण केले. हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत भारतातील अनेक राज्यातील सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते, एकीकडे 15 वर्षाचा अनुभव असलेले खेळाडू अन एकीकडे निकिता सारखी नवखी स्पर्धक तरीही न डगमगता निकिताने रेसच्या 14 फेऱ्यामधील 12 फेऱ्यामध्ये विजेतेपद पटकविले. या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्याने गोवा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, स्पर्धेत सहभागी होताना 3 हजार किलोमीटरहुन अधिक प्रवास कारने केला आहे. फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धा, हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत मिळालेल्या यशाचे श्रेय निकिता तिचे वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री टकले, पती शुभम खडसरे, व सिंहाचा वाटा प्रशिक्षक चेतन शिवराम यांना असल्याचे आवर्जून सांगते.पावसाळ्याच्या मोसमातील या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर  आगामी गोवा व बेंगलोर येथे होणाऱ्या स्पर्धेत यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे निकिता टकले खडसरे अतिशय उत्साहाने सांगते.कर्नाटक वा हैद्राबाद मध्ये कार रेस शौकीन खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात आहेत,   महाराष्ट्रातील पुण्यातुन सहभागी झालेल्या स्पर्धेकाचा उत्साह व कार चालविण्याची पद्धत पाहुन खूप प्रेरणा दिल्याचे निकिताने आवर्जून नमूद केले.वयाच्या 18 व्या वर्षी कार रेस स्पर्धेत आवड निर्माण झालेल्या निकिताने वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत 6 स्पर्धेत सहभागी होऊन सर्वच स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे.

No comments:

Post a Comment