खळबळजनक...डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज व स्वतःकरिता मोबाईलची लाच मागणाऱ्या पोलीसाला ॲन्टी करप्शनने केले अटक..
पुणे : - अनेक वेळा गुन्हा दाखल न करण्यासाठी तर कुठे गुन्हा दाखल करण्यासाठी लाच घेतल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहे अशीच एक नुकताच समोर आली, तक्रार अर्जावरुन
गुन्हा दाखल करण्यासाठी डेप्युटी साहेबांसाठी पॅकेज आणि स्वत: साठी मोबाईलची लाच मागणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार विरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीउद्दीन चमन शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीने शुक्रवारी (दि. 21) गुन्हा दाखल केला
आहे. याबाबत 43 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार
यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अमिरुद्दीन शेख यांनी डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज आणि स्वत:साठी मोबाईलची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. पुणे एसीबीच्या युनिटने 28 जुलै रोजी पडताळणी केली असता, पोलीस हवालदार अमिरुद्दीन शेख याने तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यासाठी डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज आणि स्वत:साठी मोबाईलची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.शुक्रवारी अमिरुद्दीन शेख यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
भारत साळुंखे पोलीस शिपाई भूषण ठाकूर, चालक पोलीस नाईक कदम यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment